नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सध्या लागोपाठ बैठका सुरु आहेत. दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोगाकडून सध्या जय्यत तयारी सुरु आहे. गुरुवारी आयोगाच्या मुख्यालयाबाहेर नागरिकांसाठी मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. निवडणुकीची घोषणा होणारी पत्रकार परिषद या स्क्रीनवरुन लाईव्ह पाहता येणार आहे.
लोकसभा निवडणूक कधी जाहीर होणार या एकाच प्रश्नाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान निवडणूक आयोगाच्या इमारतीसमोर नागरिकांसाठी मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. या एलईडी स्क्रीनवर निवडणुकीची घोषणा होणारी पत्रकार परिषद, देशभर होणारे मतदान आणि निवडणुकीचे निकाल लाईव्ह पाहता येणार आहेत.
2014 साली 5 मार्च रोजी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. परंतु यंदा 5 मार्च ही तारीख उलटून गेली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2014 साली 5 मार्चला निवडणूक जाहीर झाली होती. 7 एप्रिल 2014 ते 12 मे 2014 दरम्यान नऊ टप्प्यांमध्ये देशभर मतदान झाले होते. महाराष्ट्रात 10, 17, 24 एप्रिल अशा एकूण तीन टप्प्यांत मतदान झाले होते.
निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी जय्यत तयारी, मुख्यालयाबाहेर नागरिकांसाठी मोठी एलईडी स्क्रीन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2019 06:35 PM (IST)
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या सध्या लागोपाठ बैठका सुरु आहेत. दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोगाकडून सध्या जय्यत तयारी सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -