मुंबई: पासपोर्टसाठी दिवसेंदिवस वाट पाहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून खुशखबर आहे. केवळ पोलिस व्हेरिफिकेशनपासूनच नव्हे, तर पासपोर्ट अर्जासोबत जोडावी लागणारी कागपत्रेही कमी केली आहेत. केवळ चार कागदपत्रांत तुमचा पासपोर्ट घरी येऊ शकतो.   परराष्ट्र मंत्रालयाने केवळ चार कागदपत्रात पासपोर्ट मिळेल अशी घोषणा केली आहे. तुमच्याकडे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड आणि तुमच्यावर कोणतीही पोलिस तक्रार, गुन्हा दाखल नसल्याचं शपथपत्र (अॅफिडेव्हिट) द्यावं लागतं.   ही चार कागदपत्रं दिल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळेल. महत्त्वाचं म्हणजे पासपोर्ट मिळाल्यानंतर तुमच्या पोलीस व्हेरिफिरकेशनची प्रक्रिया पार पडेल.
पासपोर्टसाठी तुम्हाला सर्वातआधी passportindia.gov.in वर लॉगइन करून फॉर्म भरावा लागेल. पासपोर्ट फॉर्म भरताना अजिबात घाईगडबड करु नका. नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक खरी माहिती भरा.   हा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला स्वत: (तुमच्या वेळेनुसार) पासपोर्ट ऑफिसकडून अपॉईटमेंटची तारीख/वेळ निवडावी लागेल. या अपॉईंटमेंटवेळी तुमच्या कागदपत्रांची तपासणी - व्हेरिफिकेशन होईल.   पासपोर्ट ऑफिसमध्ये जन्मदाखला, रहिवासी दाखला, ओळखपत्र आणि बोर्ड सर्टिफिकेट या सर्वांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स कॉपीज नेणं विसरू नका. शक्य असल्यास तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्र घेऊन जा.
अपॉईंटमेंटबाबतही तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. कारण पाच तारखांमधून तुम्हाला शक्य असलेल्या तारखेची निवड करायाची आहे.   एकदा का तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तर त्यानंतर तुमचा फोटो काढण्यात येईल आणि तुमच्या हाताचे ठसे घेतील. त्यानंतर पासपोर्टसाठीची फी भरून तुम्हाला एक स्लिप देण्यात येईल.   त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होईल, जे तुमच्या घरीच होईल. व्हेरिफिकेशनसाठी पोलीस तुमच्या घरी येतील, त्यावेळी तुम्ही तिथं असणं आवश्यक आहे. पोलीस व्हेरिफिकेशन कधी होईल, याची पूर्वसूचना तुम्हाला दिली जाईल. व्हेरिफिकेशननंतर पोलीस रिपोर्ट तयार करून त्यांची प्रक्रिया पूर्ण करतील. मग तुमचा पासपोर्ट स्पीड पोस्टने तुमच्या पत्त्यावर पाठवला जाईल.   पोलीस व्हेरिफिकेशनसाठी वेळ लागत असल्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने यामध्ये लवचिकता ठेवली आहे. म्हणजे पासपोर्ट मिळाल्यानंतरही तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होऊ शकतं.

संबंधित फोटो फिचर

7 दिवसात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?