कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2017 08:51 PM (IST)
ड्रोनच्या आवाजाने बिथरलेल्या मधमाशा पोळे सोडून बाहेर पडल्या आणि त्यांनी दिसेल त्याच्यावर हल्ला चढवला. मधमाशांच्या हल्ल्यात नेमके वनमंत्री सापडले आणि त्यांना मधमशांनी दंश केला.
बेळगाव : कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्यामुळे त्यांना वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम सोडून पळ काढावा लागल्याची घटना घडली आहे. जैव विविधता उद्यानाचे उदघाटन करण्यासाठी आज (शुक्रवार) व्हीटीयू परिसरात वनमंत्री आले होते. यावेळी ड्रोनच्या आवाजाने बिथरलेल्या मधमाशा पोळे सोडून बाहेर पडल्या आणि त्यांनी दिसेल त्याच्यावर हल्ला चढवला. मधमाशांच्या हल्ल्यात नेमके वनमंत्री सापडले आणि त्यांना मधमशांनी दंश केला. वन कर्मचारी आणि ड्रायव्हरच्या मदतीने त्यांनी आपली गाडी गाठली आणि तेथून पळ काढला. VIDEO :