Central govt Holidays 2024: नोव्हेंबर महिना अर्ध्याहून अधिक उलटून गेला आहे. म्हणजे या वर्षाचा जेमतेम दीड महिना उरला आहे. त्यानंतर, नवीन वर्ष म्हणजेच 2024 सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central government) सुट्यांची (Holidays) नवी यादी लागू होणार आहे. नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुट्टयांच्या बाबतीत चांगलं जाणार आहे.
सुट्ट्यांचा विचार केला तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही नवीन वर्ष खूप चांगले जाणार आहे. केंद्र सरकारने 2024 च्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. सुट्ट्यांबाबत दिलेल्या निवेदनात सविस्तर माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना केवळ पहिल्या नाहीतर दुसर्या परिशिष्ट सूचीमध्ये देखील ऐच्छिक रजा मिळणार आहेत. परिशिष्टाच्या दुसऱ्या यादीतील सुट्ट्यांना प्रतिबंधित सुट्ट्या म्हणतात. दिल्ली किंवा नवी दिल्ली येथे तैनात असलेले केंद्रीय कर्मचारी दुसऱ्या यादीतून दोन सुट्ट्या निवडू शकतात म्हणजे पर्यायी सुट्ट्यांची यादी. तर ज्या कर्मचाऱ्यांची पोस्टिंग दिल्ली किंवा नवी दिल्लीच्या बाहेर आहे, ते पर्यायी यादीतून तीन सुट्ट्या निवडू शकतात.
दिल्ली/नवी दिल्ली कर्मचाऱ्यांसाठी राजपत्रित सुट्ट्या
1) प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी 20242 ) होळी - 25 मार्च 20243 ) गुड फ्रायडे - 29 मार्च 20244 ) ईद अल-फित्र - 11 एप्रिल 20245) राम नवमी - 17 एप्रिल 20246 ) महावीर जयंती - 21 एप्रिल 20247) बुद्ध पौर्णिमा - 23 मे 20248) बकरीद - 17 जून 20249) मोहरम - 17 जुलै 202410 ) स्वातंत्र्य दिन - 15 ऑगस्ट 202411 ) जन्माष्टमी - 26 ऑगस्ट 202412 ) ईद-ए-मिलाद - 16 सप्टेंबर 202413 ) गांधी जयंती - 02 ऑक्टोबर 202414 ) दसरा - 12 ऑक्टोबर 202415) दिवाळी - 31 ऑक्टोबर 202416) गुरु नानक जयंती - 15 नोव्हेंबर 202417 ) ख्रिसमस - 25 डिसेंबर 2024
दिल्लीच्या बाहेर पोस्ट केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राजपत्रित सुट्ट्या
1) प्रजासत्ताक दिन2) स्वातंत्र्य दिन3) गांधी जयंती4) बुद्ध पौर्णिमा5) ख्रिसमस6) दसरा (विजय दशमी)7) दिवाळी 8) गुड फ्रायडे9) गुरु नानक जयंती10) ईद-उल-फित्र11) ईद-उल-जुहा12) महावीर जयंती13) मोहरम14) ईद-ए-मिलाद
महत्त्वाच्या बातम्या: