Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मोदी कुटंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं ट्वीट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज पहाटे साडेतीन वाजता पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन मोदी यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी हिराबेन यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्यावर उपचार सुरु असताना निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास