नवी दिल्ली : ईशान्य भारत आणि बिहारवर वरुणराजा चांगलाच कोपल्याचं चित्र आहे. ईशान्य भारतात मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळं ईशान्य भारतातले तब्बल 14 लाख नागरिक प्रभावित झाले असून, 16 जणांचा मृत्यू झालाय. पावसामुळं जवळपास सगळ्याच नद्यांना पूर आला आहे. यात सर्वात मोठा फटका हा आसामला बसला आहे.
आसाममधील 17 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. ज्यामुळे 4 लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. ब्रह्मपुत्रा नदीची पातळी वाढल्याने आसाममध्ये धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, जोरहाट, डारेंग, बारपेटा, नलबारी, मझौली, चिरंग, दिब्रूगड आणि गोलाघाटसह 17 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच या पुरामुळे 16 लाख हेक्टरवरील पीकही नष्ट झालं आहे.
गेल्या 48 तासात पावसाचे प्रमाण इतके आहे आहे की 64 हून अधिक रस्ते व 12 पूल पाण्याखाली गेले आहेत. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सुद्धा पूरस्थितीचं चित्र आहे. त्यामुळे प्राण्यांचही जनजीवनही विस्कळीत झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे.