VIDEO: पावसानं हैदराबादला झोडपलं, महाभयंकर पुराची दृश्य कॅमेऱ्यात कैद
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2016 11:40 AM (IST)
हैदराबाद: हैदराबादमध्ये पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे.येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. येथील एका प्लायओव्हरला तर अक्षरश: नदीचं रुप आलं आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्यानं एवढ्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांच्या चांगलंच नाकीनऊ येत आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणामध्ये शाळा आणि महाविद्यालायांना 2 दिवसांच्या सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. जोरदार पावसामुळे येथील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. दरम्यान, येथील परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या जवनांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डेही पडले आहेत. काल रात्रभरात दोन तासांमध्ये जवळजवळ 106 मिमी पाऊस पडला आहे. VIDEO: