पंजाब : देशात तापमानाचा पारा (Heat Wave ) वाढलेला आहे. अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे आवश्यक असेल तर घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जात आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि चंदीगढ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने वाढत्या उन्हामुळे सरकारी कार्यालयाच्या कामकजांच्या वेळेमध्ये बदल केला आहे. आता सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत. यामुळे विजेची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. मान सरकारच्या या निर्णयाचे सध्या कौतुक होत आहे
मंगळवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा निर्णय 2 मे ते 15 जून पर्यंत लागू करण्यात आला आहे. सकाळी लवकर सरकारी कार्यालये उघडल्याने विजेची बचत होईल. दुपारच्या वेळेत उकाड्यामुळे वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ होते. जर दुपारच्या वेळेत कार्यालये बंद ठेवली तर तर वीजेची मोठी बचत होतील. पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान देखील कार्यालयात सकाळी 7.30 वाजता पोहचले.
भगवंत मान म्हणाले, मी सकाळी 7.30 वाजता पोहचलो. पंजाबच्या इतिहासात प्रथमच हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा सर्वांना लाभ होणार आहे. राज्यातील नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत करावे. सकाळी साडे सात वाजता कार्यालये सुरू झाल्यामुळे सामान्य नागरिकांनी देखील फायदा होणार आहे. सामान्य नागरिक देखील आपले कामे करण्यासाठी सकाळच्या वेळेतच त्यांची कामे पूर्ण करता येईल. यामुळे रोजगारावर कोणताही परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना सरकारी कामे करण्यसाठी आत्ता सुटी घ्यावी लागणर नाही. तसेच उन्हात जावे लागणार आहे.
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तापमान चाळीशी पार गेल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे . उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत. एसी, पंखे कुलरचा वापर सर्वत्र वाढला आहे त्यामुळेच विजेची मागणी देखील वाढलेली पाहायला मिळत आहे.
उष्णता वाढली, काय घ्याल काळजी?
दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका. विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल
इतर महत्त्वाच्या बातम्या :