नवी दिल्ली : एचडीएफसी लिमिटेडने कर्जाच्या व्याज दरात 0.15 टक्के कपात केली आहे. मात्र, या कपातीचा एचडीएफसीच्या सध्याच्या ग्राहकांनाच लाभ घेता येणार आहे.
रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (RTLR) 0.15 टक्क्यांनी केलेली कपात 19 जानेवारीपासून लागू असेल, असे एचडीएफसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. कर्ज व्याज दरातील ही कपात अनिवासी भारतीय ग्राहकांनाही लागू असणार आहे.
एचडीएफसी लिमिटेडने जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात नव्या ग्राहकांसाठी कर्जाच्या व्याज दरात कपात केली होती. 75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर कमी करुन 8.7 टक्के करण्यात आले आहे आणि 75 लाख रुपयांवरील कर्जावर 8.75 टक्के व्याज असेल.
विशेष म्हणजे महिला अर्जदारांना कर्जावरील व्याज दरात 0.05 टक्क्यांची सूट मिळणार आहे.