10 जुलैपासून खातेधारकांना 1 रुपया पासून 25 हजार रुपयांपर्यंतच्या यूपीआय ट्रांझॅक्शनवर 3 रुपये चार्ज अधिक सर्विस टॅक्स द्यावा लागणार होता. तसंच 25 हजार आणि 1 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये चार्ज द्यावा लागणार होता.
यूपीआय म्हणजे काय?
- यूपीआई म्हणजेच यूनीफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) पैसे पाठवण्याचा नवा मार्ग आहे. NEFT, RTGS आणि IMPS सिस्टमद्वारे पैसे पाठवण्यापेक्षा यूपीआय जास्त सोपा मार्ग आहे.
- प्रत्येक बँकेचं यूपीआय अप आहे. ज्यावर युनिक आयडी आणि यूपीन सेट करून पैशांची देवाणघेवाण केली जाते. यावरून पैसे पाठवतांना दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याबद्दलची माहिती म्हणजे अकाउंट नंबर, शाखेचं नाव, खातेधारकाचं नाव अशी माहिती असणं आवश्यक नाही.
- तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील आणि त्यासाठी त्याला खाते क्रमांक सांगायचा नसेल तर यूपीआय उत्तम माध्यम आहे.
- यूपीआयद्वारे खाते क्रमांक जाणून न घेताही पैसे पाठवता येतात. कारण याद्वारे बँक खात्याशिवाय वर्च्युअल पेमेंट अड्रेसद्वारेही (VPA) पैसे पाठवता येतात.