Vidhansabha 2024: नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांकडून तेथील उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत. भाजपने आज हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी 67 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या मतदारसंघात भाजपने बदल केला आहे. यंदा ते लाडवा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानातून निवडणूक लढवत आहेत, सध्या ते करनाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल वीज यांना अंबाला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  

भाजपच्या (Bjp) केंद्रीय समितीकडून हरियाणतील (Haryana) विधानसभेच्या (Vidhansabha) 90 जागांपैकी 67 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. हरियाणात आपने लोकसभेची एक जागा लढली होती, एका लोकसभा क्षेत्रात 9 विधानसभेच्या जागा येतात, त्या अनुषंगाने आपने 10 जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस फक्त 7 जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस हरियाणात आपसोबत युती करण्यासाठी एवढा आटापीटा का करीत आहे? याचे कारण फक्त भाजप असल्याचे दिसून येते. 

पहिल्या यादीत जाहीर झालेले उमेदवार

कालका - शक्ति रानी शर्मापंचकूला - ज्ञान चंद गुप्ताअंबाला शहर - असील गोयलमुलाना - संतोष सरवनसढौरा - बलवंत सिंहजगाधरी - कंवर पाल गुर्जरयमुनानगर - धनश्याम दास अरोड़ारादौर - श्याम सिंह राणाशाहबाद - सुभाष कलसानाथानेसर - सुभाष सुधापेहोवा - सरदार कमलजीत सिंह अजरानागुहला - कुलवंत बाजीगरकलायत - कमलेश ढांडाकैथल - लीला राम गुर्जरनीलोखेड़ी - भगवान दास कबीरपंथी