Sports Minister & Women Coach Controversy: हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह (Sandeep Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला प्रशिक्षकाने संदीप सिंहवर (Sandeep Singh) लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक छळाच्या आरोपानंतर संदीप सिंह म्हणाले आहेत की, ''तुम्हा सर्वांना माहित आहे की माझी प्रतिमा डागाळण्यासाठी माझ्याविरोधात वातावरण तयार करण्यात आले आहे. क्रीडा विभागाच्या कनिष्ठ प्रशिक्षकाने माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत. त्याची योग्य प्रकारे झाली पाहिजे. या चौकशीचा अहवाल येईपर्यंत मी क्रीडा मंत्रालयाचा राजीनामा देत आहे, हे खाते मी मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील.''
पीडितेचे म्हणणे आहे की, ''संदीप सिंह (Sandeep Singh) यांनी मला त्यांच्या घरी बोलावले, त्यांनी सांगितले की, तुला नोकरी हवी असेल तर कागदपत्रे घेऊन माझ्या घरी ये. मी माझे सर्व पेपर्स घेऊन त्यांच्या घरी गेले, दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे स्पोर्टिंग स्टाफ आणि इतर लोक तिथे होते. मी पहिल्यांदाच त्यांच्या चंदीगड येथील शासकीय निवासस्थानी गेले होते. ते म्हणाला मला म्हणाले, दुसऱ्या खोलीत जाऊ, तिथे आपण आरामात बोलू. त्यांनी माझी कागदपत्रे तिथेच ठेवली आणि माझं शोषण केलं. त्यांनी माझ्या पायावर हात ठेवला आणि म्हणाला की, मी तुला पहिल्यांदा पाहिल्यापासून तुला आवडते, तुझी फिगर चांगली आहे. मी तुला स्पॉन्सर करीन, तू मला आनंदी ठेव, मी तुला आनंदी ठेवीन. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. माझा टी-शर्ट फाडला, मी आरडाओरड ही केली,पण मला कोणीही मदत केली नाही. मी त्यांना म्हणाली मला जाऊ द्या, मग ते म्हणाले तुझ्या नोकरीचा प्रश्न आहे. जर तू मला आनंदी ठेवू शकत नाहीस तर तू काहीही करू शकत नाहीस.''
या सर्व आरोपांवर माध्यमांशी बोलताना संदीप सिंह (Sandeep Singh) म्हणाले की, मला भेटण्यासाठी खूप लोक येतात. इथे किती लोक येतात? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, माझी प्रतिमा डागाळली असल्याने मीही चौकशी करेन. अगदी लहान वयात मी ऑलिम्पिकमध्ये खेळून भारताचा कर्णधार झालो. अगदी लहान वयात मी अनेक विक्रम केले. आमदार झालो, खूप कमी वयात मंत्री झालो. माझे यश काही लोकांना बघवत नाही आहे. याची चौकशी होईल''