राहुल गांधी अहमदाबादेतील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हार्दिक पटेलही दिसत आहे. त्यामुळे राहुल गांधींशी हार्दिक पटेलची भेट झाली का? आणि भेट झालेली असूनही आपण भेटण्याची ऑफर नाकारली, असं हार्दिक पटेल सांगत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान एबीपी न्यूजने हार्दिक पटेलला याबाबत प्रश्न विचारला. मात्र आपण अहमदाबादमध्ये नसल्याचं त्याने सांगितलं.
आपण राजकारणात जाणार नाही, मात्र भाजपच्या पराभवासाठी काम करु, असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसशी वाढलेली जवळीक पाहता हार्दिक पटेलचा काँग्रेसला पाठिंबा आहे का, अशीही चर्चा गुजरातच्या राजकारणात सुरु आहे.
पाहा व्हिडिओ :