नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते www.esampada.mohueda.gov.in हे वेब पोर्टल नुकतंच सुरू करण्यात आलं. या पोर्टलवरुन नागरिकांना सरकारी मालमत्तेबाबतची सद्यस्थिती समजेल. याशिवाय केंद्र सरकारची देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली मालमत्ता म्हणजे खुली मैदाने, हॉल, रेस्ट हाऊस, गार्डन आता सर्वसामान्यांना लग्न समारंभ वेगवेगळे सामाजिक धार्मिक कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतील.
बसला ना तुम्हालाही धक्का? पण, हे खरंय. कोणताही कार्यक्रम असो, त्याची आखणी करण्याची सुरुवातच मुळी होते कार्यक्रमासाठीच्या ठिकाणाच्या शोधापासून. उपस्थितांची संख्या, कार्यक्रमाचं स्वरुप अशा एकंदर गोष्टींचा निकष लक्षात घेत मग ठिकाणं निर्धारित केली जातात. त्यामुळं आता विविध कार्यक्रमांसाठी जागा भाड्यानं शोधणाऱ्यांपुढं आता एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
या पर्यायाअंतर्गत विविध कार्यक्रमांसाठी कोणतीही मालमत्ता कुठे आहे, त्यासाठी नेमकं कोणत्या दिवसांसाठी बुकिंग झालं आहे, बुकींग करायचं झाल्यास ते नेमकं कसं करायचं याची सविस्तर माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. किंबहुना यासाठीच हे स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे.
सदर वेब पोर्टलवर नेमकी कोणती माहिती उपलब्ध?
केंद्र सरकारने सुरू केलेल्या वेब पोर्टलवर चाळीस ठिकाणी असलेल्या सरकारच्या 1 लाख 9 हजार अधिक कोर्ट्स उपलब्ध असतील.
28 ठिकाणी असलेल्या 45 कार्यालयांचा कॅम्पस आणि 1.1 25 कोटी वर्ग फूट जागा भाड्याने मिळू शकेल. तर, 62 ठिकाणावर असलेली 1176 हॉलिडे होम सुद्धा उपलब्ध आहेत. शिवाय या पोर्टलच्या माध्यमातून विज्ञान भवन सारख्या ठिकाणीही बुकिंग करता येणार आहेत. यात उल्लेख असेलेल्या पोर्टलवर आणि ॲप वर महाराष्ट्रातल्या मालमत्ता असतील त्या कोणत्या आणि किती रूपये भाडे असेल याचीही माहिती मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पोर्टलसोबतच केंद्राच्या मालमत्तांबाबत असलेल्या चार वेगवेगळ्या संकेतस्थळावरील माहिती एकत्रित करून हेमावास आणि अशोका दोन मोबाईल ॲपही सुरू करण्यात आली आहेत. जेथे बुकिंगसह भाड्याचे पैसे देण्याची सुविधाही उपलब्ध असेल.