How To Upload Tiranga Selfie : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'हर घर तिरंगा अभियाना' अंतर्गत तिरंग्यासोबत सेल्फी (Selfie) काढून ते अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन खास करण्यासाठी पंतप्रधानांनी हे खास आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी जनतेला hargarhtiranga.com वेबसाईटवर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील सर्वजण या वेबसाईटवर आपले तिरंग्यासोबतचे सेल्फी (Selfie with Tiranga) अपलोड करू शकता.


पंतप्रधान मोदींनी या अभियानांतर्गत एक ट्विट देखील केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "तिरंगा हे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचा तिरंग्याशी भावनिक संबंध आहे आणि तो आपल्याला पुढे राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या "हर घर तिरंगा" आंदोलनात सहभागी व्हावं, असं माझं आवाहन आहे."






अशी अपलोड करा सेल्फी


हर घर तिरंगा अभियान हा 2022 साली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. या अंतर्गत मंत्रालयाने एक वेबसाईट देखील सुरू केली, ज्यावर देशातील जनतेला सेल्फी अपलोड करण्याचा पर्याय मिळतो. या वेबसाईटवर आतापर्यंत 62 कोटींहून अधिक लोकांनी त्यांचे सेल्फी अपलोड केले आहेत.



  • सर्वात आधी harghartiranga.com वेबसाईवर जा.

  • येथे तुम्हाला होमपेजवर 'अपलोड सेल्फी विथ फ्लॅग'चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • आता तुम्हाला एक पॉपअप दिसेल, त्यात तुमचं नाव लिहा आणि सेल्फी अपलोड करा.


सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्हाला 'hargartiranga.com' वेबसाईटवर तुमचं नाव आणि फोटो वापरण्यासाठी तुमची संमती द्यावी लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमचा सेल्फी सबमिट करू शकाल. सेल्फी सबमिट केल्यानंतर, नावाच्या मदतीने तुम्ही तुमचा सेल्फी वेबसाईटवर देखील शोधू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला सेल्फी दिसत नसेल तर तुम्हाला तो 16 ऑगस्टनंतर पाहता येणार आहे.


हेही वाचा:


Independence Day: भारताव्यतिरिक्त कोणते देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात?