Republic Day 2025 LIVE: प्रजासत्ताक दिनाची 76 वर्ष... देशभरात उत्साह, कर्तव्य पथावर जग पाहील भारताची ताकद
Happy Republic Day 2025 LIVE Updates: आज देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडतोय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
अकोला: अकोल्यात दिव्यांगांसंदर्भातील अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलंय. यावेळी दिव्यांगाच्या मानधनात वाढ करावी, दिव्यांगांना घरकुल द्यावे, दिव्यांगांच्या मुलांची पेन्शन 21 वर्ष झाल्यानंतर बंद करू नये, दिव्यांगासाठी व्यवसाया करीता 200 स्केअर फुट जागा द्यावी, दिव्यांग कल्याणासाठी राज्याच्या एकूण बजेटच्या पाच टक्के निधीची तरतूद करावी, जिल्हास्तरावर स्वतंत्र खाते उघडून तो खर्च करावा, दिव्यांगाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती आणि प्रवेश शुल्क माफ करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्यात. यावेळी दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष मोमीन शेख यांनी गाडगेबाबा करून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलनात शेकडो प्रहार पक्षाचे दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.
Pune: पुण्यात 40 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीस GBS ची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतं असल्याने या रुग्णास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला रुग्णालयात ICU मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने साध्या रूममध्ये रुग्णास हलवण्यात आले. मात्र काल अचानकपणे त्याला श्वास घेण्यात अडचण येतं असल्याने पुन्हा एकदा ICU मध्ये भरती करण्यात आले.
मात्र उपचारदरम्यान या रुग्णाचा मृत्यू झालाय. या रुग्णास पुण्यात GBSची लागण झाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्याशिवाय रुग्णाचा व्हीसेरा देखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या रुग्णाचा मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतीत प्राथमिक माहिती ही शवविच्छेदन आणि व्हीसेरा तपासणी अहवाला नंतरच प्राप्त होईल. मात्र GBS बाबतीत कोणीही अफ़वा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरूण जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे
तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे.
मुंबई: सकाळी साडे पाच वाजता संपणारा ब्लॉक सव्वा दहा वाजता संपला, हा गर्डर बसवताना एक जॅक तुटला त्यामुळे एका कामगाराला देखील दुखापत झाली आणि काम अखेर बंद करावे लागले. परिणामी मध्य रेल्वेच्या लोकल केवळ भायखळा, दादर आणि कुर्ला स्थानकात थांबवण्यात येत होत्या. याचा मोठा फटका प्रवाश्यांना बसला. अखेर पाच तासांनंतर लोकल वाहतूक सीएसएमटीपर्यंत सुरू करण्यात आली आहे.
मात्र गर्डरचे काम अर्धवट असल्याने बी एम सी आणि मध्य रेल्वेकडून एका क्रेन द्वारे गर्डर सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तरी देखील या पुलाखाली 30 किमी प्रति तासाची वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. केवळ लोकल वाहतुकीवर नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील याचा फटका बसला, मेगा ब्लॉक दरम्यान 11 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. मात्र ब्लॉक अचानक वाढल्याने आणखीन 13 मेल एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलण्यात आले. याच प्रमाणे 17 मेल एक्सप्रेस कल्याण, पनवेल, दादर स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या तर 12 गाड्या दादर, एल टी टी, पनवेल, नाशिक वरून सोडण्यात आल्या,
यासोबत 4 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. या गर्डर लॉन्चिंग वेळी नेमके काय चुकले? कशामुळे उशीर झाला यासंदर्भात मुंबई महापालिकेला विचारणा केली असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मुंबईकरांना माहिती देण्यात आली नाही.
संगमनेर: तालुक्यातील खराडी गावातील पर्बत वस्तीवर काल(25 जानेवारी) सकाळी 8 वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात चार गाई जखमी झाल्या होत्या. दरम्यान आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान परिसरात ऊस तोड करण्यासाठी आलेल्या लोकांनी उसाचे पाचट पेटवले. त्यामुळे ऊसात लपलेला हा बिबट्या वस्तीकडे आला आणि चार गायींवर हल्ला केला. त्यांनतर वन विभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद केले. वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी चोहो बाजूंनी कडे बनवत जाळी टाकून बिबट्याला जेरबंद केलंय. बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा हा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झालाय.
जालना: जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच तेही प्रजासत्ताक दिनी पंकजा मुंडे यांचे जालन्यात आगमन झालं. आज त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पाऊल ठेवणे यापेक्षा मोठा सुवर्णयोग काय हे असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील लोकांना कधी पक्षपातीपणा जाणवनार नाही, अत्यंत संवैधानिक पद्धतीने सर्व वर्गाला न्याय मिळेल, असं वचन देखील पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हावासियांना दिलं.
अकोला : अकोल्यात आज पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलंय. शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे शासकीय ध्वजारोहनाचा हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्या वतीने पालकमंत्र्यांना सलामी देण्यात आलीय. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेय. गेल्या वर्षभरात उत्कृष्ठ सेवा केलेल्यांचा सत्कार यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. यावेळी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी विविध शासकीय योजना आणि निर्णयांचा उहापोह केलाय.
अकोला : अकोल्यात आज पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलंय. शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे शासकीय ध्वजारोहनाचा हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्या वतीने पालकमंत्र्यांना सलामी देण्यात आलीय. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेय. गेल्या वर्षभरात उत्कृष्ठ सेवा केलेल्यांचा सत्कार यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. यावेळी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी विविध शासकीय योजना आणि निर्णयांचा उहापोह केलाय.
अकोला : अकोल्यात आज पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलंय. शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे शासकीय ध्वजारोहनाचा हा कार्यक्रम पार पडलाय. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्या वतीने पालकमंत्र्यांना सलामी देण्यात आलीय. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेय. गेल्या वर्षभरात उत्कृष्ठ सेवा केलेल्यांचा सत्कार यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. यावेळी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी विविध शासकीय योजना आणि निर्णयांचा उहापोह केलाय.
जळगाव: अमळनेर तालुक्यातील मारवड येथील गोपाल पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गोपाल पाटील यांना झालेल्या मारहाणीची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी योग्य प्रकारे सहकार्य न करता आरोपींना मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे प्रशासन आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नांदेड: जिल्ह्यातील माहूर येथे भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्याने पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. सर्वावर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून चार रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माहुर येथे ठाकूर बुवा यांची यात्रा सुरु आहे. या यात्रेसाठी वेगवेगळ्या भागातून भाविकांच्या पायी दिंडी येतात. हिंगोली जिल्ह्यातील जवळा येथील दिंडी यात्रेसाठी आली होती. काल एकादशी असल्याने रात्री या दिंडीतील भाविकांनी भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली. दरम्यान, पहाटे त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. सर्व रुग्णांना पहाटेच माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. आता सर्व रुग्णाची प्रकृती बरी असून सायंकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.
नांदेड: जिल्ह्यातील माहूर येथे भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्याने पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. सर्वावर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून चार रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माहुर येथे ठाकूर बुवा यांची यात्रा सुरु आहे. या यात्रेसाठी वेगवेगळ्या भागातून भाविकांच्या पायी दिंडी येतात. हिंगोली जिल्ह्यातील जवळा येथील दिंडी यात्रेसाठी आली होती. काल एकादशी असल्याने रात्री या दिंडीतील भाविकांनी भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली. दरम्यान, पहाटे त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. सर्व रुग्णांना पहाटेच माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. आता सर्व रुग्णाची प्रकृती बरी असून सायंकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.
धाराशिव: महाराष्ट्रात पहिल्यांदाच मूकबधिर दिव्यांग विद्यार्थ्याच्या प्लॅटून ने तिरंग्याला सॅल्यूट केलाय. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज धाराशिव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी विविध विभागाच्या प्लॅटून ने तिरंग्याला सॅलूट केला. मात्र त्यामध्ये एक प्लॅटून लक्षवेधी ठरले.
धाराशिव जिल्ह्यातील मूकबधिर दिव्यांग 32 विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा पद्धतीने प्लॅटून परेड दिला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मूकबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांनी धाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिनानिमीत्त तिरंग्याला सॅलूट दिला आहे. आजपर्यंत शाळांमधील सर्वसाधारण मुले यामध्ये सहभागी होत होती माञ आता दिव्यांगाना संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. सादरीकरण करताना शिक्षकांनी सांकेतून भाषेतून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील मुख्य ध्वजारोहणावेळी राजकीय नाट्यबाजी पाहायला मिळाली. खासदार संदिपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याजवळ बसण्याचे टाळले. तर अंबादास दानवे यांनी खैरेंच्या बाजूला न बसता भुमरे यांच्या बाजूला जाऊन बसले. दरम्यान संदिपान भुमरे हे घटनाबाह्य पालकमंत्री होते, त्यांना आपण आज ही मानत नाही. मात्र संजय शिरसाठ यांना आपण स्वीकारला असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले. तर शिरसाठ यांनी खैरेंचे आभार मानलं. पण संदिपान भुमरे यांनी खैर यांच्या टीकेला उत्तर दिलं.
Republic Day Parade Live: 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रध्वज फडकावला. ते म्हणाले, "आजचा 76 वा प्रजासत्ताक दिन हा केवळ आपल्या देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोतच, पण खऱ्या अर्थानं लोकशाहीची जननी आहोत आणि आपल्याला एक स्वावलंबी भारत घडवायचा आहे. लोकशाही मार्गाने, 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणे, विश्वगुरू बनणे हे पंतप्रधानांनी दिलेले एक ध्येय आहे. मला वाटतं की, आज प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण केवळ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार नाही. मी जगालाच नव्हे तर एक स्वावलंबी भारतही घडवीन."
Republic Day 2025 LIVE: प्रजासत्ताक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, "प्रजासत्ताक दिन हा नेहमीच देशासाठी अभिमानाचा क्षण असतो. मला वाटते की आपण बरेच काही साध्य केले आहे आणि आपल्याला आणखी बरेच काही साध्य करण्याची आशा आहे. आपल्याकडे राष्ट्रपती आहेत. इंडोनेशियाचे प्रबोवो सुबियांतो हे आमचे विशेष पाहुणे होते. 1950 मध्ये, पहिल्या प्रजासत्ताक दिनी, इंडोनेशियाचे राष्ट्रपती पाहुणे होते, म्हणून 75 व्या वर्धापन दिनी, पुन्हा एकदा, आपल्याकडे इंडोनेशिया असणे खूप योग्य आहे. ते एक भौगोलिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. . सांस्कृतिक, राजकीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या हा देश आपल्या खूप जवळचा आहे. मला खात्री आहे की आजचा दिवस संपूर्ण देशासाठी आनंदाचा असेल."
Republic Day 2025 LIVE Updates : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर आधारित आपले संविधान हे भारतीय प्रजासत्ताकाचा अभिमान आहे, ते प्रत्येक भारतीयाचे संरक्षक कवच आहे. धर्म, जात, प्रदेश आणि भाषा."
ते पुढे म्हणाले की, संविधानाचा आदर करणे आणि त्याचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जय हिंद, जय भारत, जय संविधान.
Republic Day 2025 LIVE Updates : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेट येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतील.
प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सलामी घेतील. हे दृश्य पाहण्यासाठी सुमारे 10 हजार खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
Republic Day 2025 : छत्रपती संभाजी नगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मैदानावर आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे. मात्र यावेळी शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे आणि ठाकरे गटावचे चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांच्या बाजूला बसण्याचे टाळले, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भुमरे यांच्या बाजूला जाऊन बसले. एका बाकावर शिंदे गटाचे भुमरे,आमदार प्रदीप जैसावल यांच्या शेजारी दानवे बसले होते तर दुसरीकडे खैरे एकटे बसल्याचे पाहायला मिळाले.
Nashik News : नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंड येथे 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन ...
राष्ट्रध्वजवंदनासाठी मंत्री गिरीश महाजन राहणार उपस्थित...
पालकमंत्री पद स्थगितीनंतर गिरीश महाजन नाशिकचे ध्वजवंदन करणार...
पोलीस परेड ग्राउंड येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित...
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा सन्मान केला जाणार.
Beed News : मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण पार पडले संतोष देशमुख यांच्या हस्ते दरवेळी या ठिकाणी ध्वजारोहण व्हायचे. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मागच्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून जातीय संघर्ष पाहायला मिळाला. त्या जातीय संघर्षातून एक नवा आदर्श उभा करत धनंजय देशमुख यांनी आजचे ध्वजारोहण हे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या हस्ते करण्याची विनंती त्यांना केली आणि दत्ता बारगजे यांनी आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे सावट या ध्वजारोहण कार्यक्रमावर सुद्धा पाहायला मिळाले.
रायगड : मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. खरवली काळीज ग्रामपंचायतीमधील आवारात प्रजासत्ताक दिनाला मंत्री गोगावले यांची उपस्थिती पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाला भरत गोगावले यांनी त्यांच्या होम ग्राउंडला ध्वजारोहण केलं आणि सर्व नागरीकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Republic Day 2025 LIVE: आज भारत आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कर्तव्य पथावर आयोजित राज्य कार्यक्रमाला उपस्थित राहतील. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आहेत. आज भारताच्या संस्कृती आणि लष्करी सामर्थ्यावर एक सादरीकरण केले जाईल.
Republic Day 2025 LIVE Updates : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आज आपण आपल्या गौरवशाली प्रजासत्ताकाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या प्रसंगी, आपण त्या सर्व महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करतो, ज्यांनी आपलं संविधान बनवून, आपला विकास प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकता. आधारित रहा."
ते पुढे म्हणाले की, हा राष्ट्रीय उत्सव आपल्या संविधानाच्या मूल्यांचे जतन करेल आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी बळकटी देईल अशी आशा आहे.
Republic Day 2025 LIVE Updates : भिवंडी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा 23 ते 27 जानेवारी दरम्यान भिवंडीत पाच दिवसांचा मुक्काम आहे. आज, 26 जानेवारी रोजी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 8.15 वाजता पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे त्यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा संपन्न होत आहे.
या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन असून परिसरात कडे कोट बंदोबस्त लावण्यात आला आहे
Nashik News : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू आहे. नाशिकच्या नांदगावातील शासकीय इमारती तिरंग्याच्या आकर्षक अशा विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. शहरातील नगरपरिषद कार्यालय या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने सजले आहे. संपूर्ण इमारतीवर आकर्षक अशा तिरंगा ध्वजाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नगरपरिषदेची ही इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Republic Day 2025 LIVE Updates : आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन वर्ष साजरे होत असताना पुणे येथील एका विठ्ठल भक्ताने विठुरायाची राऊळी तिरंगी रंगाच्या फुलात सजविली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयन रम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे .
विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, कामिनी आदी एक टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. ही फुल सजावट सेवा पुणे येथील मोरया ग्रुपचे सचिन चव्हाण यांनी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे स्वागतासाठी काल रात्री विठ्ठल मंदिराला तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई केली असून आज पहाटे आता विठ्ठल मंदिरही तिरंगी फुलाने सजल्याने या आनंदात विठुराया ही तिरंग्याच्या रंगात नाहून निघाला आहे
Republic Day 2025 LIVE Updates : आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन वर्ष साजरे होत असताना पुणे येथील एका विठ्ठल भक्ताने विठुरायाची राऊळी तिरंगी रंगाच्या फुलात सजविली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयन रम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे .
विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, कामिनी आदी एक टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. ही फुल सजावट सेवा पुणे येथील मोरया ग्रुपचे सचिन चव्हाण यांनी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे स्वागतासाठी काल रात्री विठ्ठल मंदिराला तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई केली असून आज पहाटे आता विठ्ठल मंदिरही तिरंगी फुलाने सजल्याने या आनंदात विठुराया ही तिरंग्याच्या रंगात नाहून निघाला आहे
76th Republic Day Parade LIVE: Nashik : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसला तिरंगा ध्वज आणि तिरंगा फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली. पंचवटी एक्सप्रेसचे सुपरवयाझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरमच्या घोषणानी परिसर दणाणून गेला होता. डोलाने फडकणारा तिरंगा ध्वज व तिरंगा थीम सजावट अश्या रूपात पंचवटी एक्सप्रेसने मनमाड रेल्वे स्थानकातून मुबंईच्या दिशेने प्रयाण केले. यावेळी रेल्वे स्थानकावरील उदघोषणा ध्वनीक्षेपकावरून देशभक्तीपर गीते लावण्यात आल्याने रेल्वे स्थानक परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.
76th Republic Day LIVE : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, तिन्ही सैन्यदल आणि डीआरडीओपासून ते अनेक राज्ये आणि मंत्रालयांपर्यंतचे चित्र आज कर्तव्याच्या मार्गावर दिसतील.
Republic Day 2025 LIVE : कर्तव्य पथावर आज 10.30 वाजता परेड सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपति प्रबोवो सुबिआंतो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
76th Republic Day LIVE Updates : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, "अमेरिकेच्या वतीनं, मी भारतीय जनतेला त्यांच्या देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनंदन करतो. ते भारताच्या संविधानाचा स्वीकार साजरा करत असताना, आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या संस्थापकांचंही स्मरण करतो. मी त्यांच्यात सामील आहे. त्याचे शाश्वत महत्त्व ओळखून."
पार्श्वभूमी
Happy Republic Day 2025 LIVE Updates: आज देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडतोय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरासह संपूर्ण देशभरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नवी दिल्लीचे डीसीपी देवेश महाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेत कोणत्याही प्रकारची चूक होण्याची शक्यता नाही. परेड दरम्यान राजधानीत सहा-स्तरीय बहु-स्तरीय सुरक्षा घेरा तयार करण्यात आला आहे. यासोबतच, 60 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 15 हजार सैनिक फक्त ड्युटी मार्गाभोवती तैनात असतील. निमलष्करी दलाचे जवान, एनएसजी कमांडो, एसपीजी कमांडो, बॉम्ब शोधक पथक, स्वाट कमांडो, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) आणि डॉग स्क्वॉड देखील तैनात केले जातील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -