पाटणा: बिहारच्या जमुईमध्ये एक विचित्र प्रेमप्रकरण समोर आलं आहे. यामध्ये तरुणाला थेट कोर्टाच्याच आदेशामुळे प्रेयसीशी लग्न करावं लागलं आहे. वृत्तानुसार, तरुण आणि त्याच्या प्रेयसीचं चार वर्षापासून प्रेमप्रकरण सुरु होतं.


 

काही दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यामुळे रागावलेल्या तरुणानं आपल्या प्रेयसीचा एक अश्लील व्हिडिओ तयार करुन थेट सोशल मीडियावरच शेअर केला. या प्रकरणीनं तरुणीनं पोलिसात त्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तरुणाला अटक केली.

 

या दोघांचं प्रेमप्रकरण लक्षात घेऊन जुमईच्या दिवाणी न्यायालयानं या दोघांना लग्न करण्याचाआदेश दिला. कोर्टाच्या आदेशानंतर दोघांनी मंदिरात लग्नही केलं. पण लग्नानंतर तात्काळ तरुणाला ताब्यात घेण्यात आलं तर तरुणी तिच्या सासरी पाठविण्यात आलं आहे.