मुंबई पोलिसांनी तपासाअंती खडसेंना क्लीन चिट दिली होती. मात्र त्यानंतर खडसेंचे फोनकॉल हॅक करणाऱ्या मनीष भंगाळेला खास पोलिस आयुक्तालयात बोलवून त्याची वेगळी चौकशी करण्यात आल्याने या प्रकरणाचं गूढ वाढलं होतं. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आपल्याकडे फोन कॉल्सच्या कालावधीचे सर्व तपशील असल्याच्या मुद्द्यावर भंगाळे ठाम आहे. सात वेळा फोन कॉल झाले असून सर्वात जास्त म्हणजे 10 मिनिटांच्या कालावधीसाठी खडसे-दाऊदमध्ये बातचित झाल्याचा दावा त्याने केला आहे.
दाऊद -खडसे कथित कॉल प्रकरण
मंगेश भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला. दाऊदच्या कॉललिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.
मंगेश भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या ४ क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे, असंही त्यानं म्हटलं होतं.
याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन खडसेंना क्लीन चीट दिली आहे.