Gyanvapi Masjid: ज्ञानवापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा कोर्टात आज सुनावणी पू्र्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला असून मंगळवारी निकाल सुनावणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर झाली.
ज्ञानवापी मशीद प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रक्रिया काय असावी याबाबत कोर्ट उद्या निकाल सुनावणार आहे. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत. त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती.
आज वाराणसी जिल्हा कोर्टातील सुनावणीत खटल्याशी संबंधितांना प्रवेश देण्यात आला. हिंदू पक्षाच्यावतीने ज्येष्ठ अधिवक्ता मदन बहादूर सिंह उपस्थित होते. त्यांच्यासोबत अॅड. हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन आदी उपस्थित होते. तर, मुस्लिम पक्षाच्यावतीने रईस अहमद आणि सी. अभय यादव उपस्थित होते. मुस्लिम पक्षाच्यावतीने अभय नाथ यादव यांनी दीन मोहम्मद यादव यांच्या 1936 च्या खटल्याचा संदर्भ दिला. यामध्ये ज्ञानवापी मशिदीत दीर्घकाळापासून नमाज अदा केली जात आहे. त्या ठिकाणी मशीद असून उच्च न्यायालयानेदेखील मुस्लिम पक्षाच्या बाजूने निकाल दिला होता, हा मुद्दा मांडला.
वाराणसी जिल्हा न्यायलयाने या वादाच्या सुनावणीची प्रक्रिया काय असावी याबाबत कोर्ट निकाल सुनावणी करणार आहे. पुढील सुनावणी सीपीसीच्या नियम 11 पर्यंत सुनावणी घ्यावी की कमिशन अहवाल आणि सीपीसीनुसार सुनावणी घ्यावी यावर निकाल सुनावणार आहे.
>>> ज्ञानवापी मशीद प्रकरणावर काय आहेत मागण्या
>> हिंदू पक्षाने काय म्हटलं?
1. शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी
2. वाजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी
3. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी
4. शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी
5. वाळूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
>> मुस्लिम पक्षाची बाजू
1. वजूखाना सील करण्यास विरोध
2. 1991 कायद्यांतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि खटल्यावर प्रश्नचिन्ह