अहमदाबाद : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या गुलबर्ग सोसायटी जळीतकांडातील दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. या जळीतकांड प्रकरणी विशेष कोर्टाने 2 जून रोजी 24 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर 36 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.


 

 

गुजरात दंगलीनंतर 2002 मध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचं वास्तव्य असलेल्या गुलबर्ग सोसायटीला आग लावण्यात आली होती. त्यात एहसान जाफरींसह 69 जण मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी गेल्या 14 वर्षांपासून न्यायालयात लढा देत आहेत.

 

गुलबर्ग हत्याकांडात 24 दोषी, तर 36 जणांची निर्दोष सुटका


 

विशेष कोर्टाचे न्यायाधीश पीबी देसाई यांनी 11 जणांना हत्या आणि इतर गुन्हे, तर विहिंप नेते अतुल वैद्यसह 13 जणांना कमी गंभीर गुन्ह्यात दोषी ठरवलं होतं.

 

 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विशेष SIT ने याप्रकरणी तब्बल 335 साक्षीदार आणि 3000 कागदपत्र सादर केले होते. एसआयटीने 24 दोषींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता विशेष कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं आहे.