नवी दिल्ली : गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारला आता चांगलाच जोर चढला आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी तर भाजपकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पाच दिवस आधी एबीपी न्यूजनं लोकनिती आणि सीएसडीएसने गुजरातचा फायनल ओपिनियन पोल केल आहे.
या ओपिनियन पोलमध्ये काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. या पोलनुसार गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुजरातमधील काही भागात तर भाजपला बराच फटका बसेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर गुजरातमधील काही भागात भाजपपेक्षा काँग्रेसला अधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे.
उत्तर गुजरातमधील ग्रामीण भागात नेमकी परिस्थिती काय?
ओपिनियन पोलनुसार, उत्तर गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. इथं भाजपला 41 टक्के मतं तर काँग्रेसला तब्बल 56 टक्के मतं मिळू शकतात.
उत्तर गुजरातमधील शहरी भागात नेमकी परिस्थिती काय?
उत्तर गुजरातच्या शहरी भागात भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण की, इथं भाजपला 50 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के मतं मिळू शकतात.
उत्तर गुजरातमध्ये नेमका कौल कुणाला?
ओपिनियन पोल पाहिल्यास उत्तर गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण एकूण मतांपैकी भाजपला फक्त 45 टक्के तर काँग्रेसला 49 टक्के मतं इथं मिळू शकतात. उत्तर गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 53 जागा आहेत.
कसा घेण्यात आला ओपिनियन पोल?
23 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 50 विधानसभा क्षेत्रात 200 बूथवर जाऊन 3655 लोकांची मतं विचारात घेतली.
संबंधित बातम्या :
ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'