Moscow-Goa Chartered Flight Emergency Landing: मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. त्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या फ्लाईटमध्ये 200 पेक्षा जास्त प्रवाशी होते. फ्लाईटमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेय. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि बॉम्ब स्कॉड घटनास्थळावर पोहचलं आहे. (Moscow-Goa Chartered Flight Emergency Landing)


गुजरात पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एबीपी न्यूज सांगितलं की, गोवा एटीसीला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटला गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आलेय. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. सध्या विमानाची तपासणी करण्यात येत आहे.  


जामनगर विमानतळावरील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की,  मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व 244 प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. सोमवारी रात्री 9.45 वाजता फ्लाईटचं विमानतळावर लँडिंग करण्यात आले. घटनास्थालवर स्थानिक पोलिसांसह रुग्णवाहिका आणि बॉब्मशोधक पथक दाखलं झाले आहे. सर्व विमानाची कसून चौकशी करण्यात येत आहे. 


 






धमकीनंतर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग -


 मॉस्कोवरुन गोव्याला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती गोवा एटीसीला मिळाली होती. त्यानंतर विमान गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आलं. विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मॉस्कोवरुन 400 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्ली विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. CISF ला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. आज मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. विमानाला जामनगरमध्ये एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप असून विमानाची कसून चौकशी करण्यात येत आहे. 


ही बातमी देखील वाचा -


गोवा गुटखाचे मालक जे एम जोशी यांना 10 वर्षांची शिक्षा; दाऊदला पाकिस्तानात  व्यवसाय सुरू करण्यात मदत केल्याचा आरोप