Gujarat Election Result 2022 : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला (Gujarat Election Result 2022) सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये भाजप (BJP) आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जाडेजा या उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. रिवाबा जाडेजा (rivaba jadeja) या सध्या आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे दक्षिण गांधीनगरमधून निवडणूक लढवणारे भाजपचे अल्पेश ठाकूर हे पिछाडीवर आहेत.


कोण आहेत रिवाबा जाडेजा


टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाने तीन वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी त्या काही काळ करणी सेनेशीही जोडल्या गेल्या होत्या. याशिवाय त्या विविध सामाजिक संस्थांशी निगडीत आहेत. रिवाबा जडेजा या मूळच्या राजकोटच्या आहेत. त्यांचे वडील शहरातील प्रसिद्ध व्यापारी आहेत. रिवाबा राजकोटच्या आत्मिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवीधर आहेत. 


2016 साली  रवींद्र जाडेजासोबत लग्न


रिवाबा जडेजा यांनी बहुतांश वेळ राजकोट आणि जामनगरमध्ये घालवला आहे. 'जद्दूस फूड फील्ड' नावाने त्यांनी रेस्टॉरंटही चालवले आहे. रिवाबा यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी त्या करणी सेनेच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षाही होत्या. 2016 मध्ये रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांचे लग्न झाले होते. गुजरात निवडणुकीत सर्वात अधिक चर्चेत असलेले उमेदवार म्हणजे, रिवाबा जाडेजा. तिकीट मिळाल्यापासूनच रिवाबा चर्चेत आहेत. पण यावरुन जाडेजा कुटुंबात मात्र मोठी फूट दिसतेय. जाडेजाची पत्नी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतेय. तर रवींद्र जाडेजाची मोठी बहिण मात्र काँग्रेसचा प्रचार करताना दिसतेय. तसेच, यामध्ये रवींद्र जाडेजा आपल्या पत्नीच्या बाजूनं तर त्याचे वडिल आपल्या मुलीच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळत आहे.


रवींद्र जाडेजाची बहीणही राजकारणात 


रवींद्र जाडेजाच्या आईचे लहान वयातच निधन झाले होते. त्यानंतर रवींद्र जाडेजाती मोठ्या बहिणीने कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. रवींद्र जाडेजाचे वडील आणि मोठी बहीण दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. मोठी बहीण नयना जामनगरमधील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.


बहुमताचा आकडा 92 


आज गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे. गुजरातमध्ये एकूण 64.33 टक्के मतदान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सध्या भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Gujarat Election 2022: 'अभी भी टाइम है...' बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर करत रवींद्र जाडेजाचं ट्वीट