अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी हार्दिक पटेलच्या भूमिकेवरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना, आता हार्दिकने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, पाटीदार आंदोलन समिती (PAAS) चे संयोजक ललित वसोया यांनी हार्दिक पटेलशी चर्चा करुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता काँग्रेसच्या तिकीटावर धोराजीमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
हार्दिक पटेलचे 10 सहकारी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार?
काँग्रेसला पाठिंबा देण्याची जाहीर घोषणा हार्दिक पेटलने स्वत: माध्यमांसमोर येऊन केली नाही. पण पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोय यांच्या राजीनाम्यामुळे हार्दिकने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे.
गुजरात निवडणुकीसाठी 36 उमेदवारांची भाजपची दुसरी यादी जाहीर
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. यासाठी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे. त्यातील भाजपने आत्तापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण काँग्रेसकडून एकही यादी जाहीर करुन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
तिकीट वाटपावरुन काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्यामध्ये बोलणी सुरु असल्याने काँग्रेसची यादी जाहीर करण्यास वेळ लागत असल्याची चर्चा आहे. पण पाटीदार आंदोलन समिती (PAAS) चे संयोजक ललित वसोया यांच्या राजीनाम्यानंतर जे संकेत मिळत आहेत, त्यानुसार, काँग्रेसकडून आता लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते.
संबंधित बातम्या
ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी?
शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार
मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण: हार्दिक पटेल
गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला दणका, ‘पाटीदार ऑर्गनायझेशन’मध्ये फूट
गुजरातमध्ये हार्दिक पटेलचा काँग्रेसला पाठिंबा?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2017 05:33 PM (IST)
पाटीदार आंदोलन समिती (PAAS) चे संयोजक ललित वसोया यांनी हार्दिक पटेलशी चर्चा करुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता काँग्रेसच्या तिकीटावर धोराजीमधून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -