BSF Soldier Lynching : भारतीय सैनिकांचे (Indian Soldier) एकमेव कर्तव्य असते ते म्हणजे भारत मातेचे रक्षण करणे, कोणत्याही परक्या देशाला आपल्या देशावर हल्ला करू न देणे, जर कोणी हल्ला करणार असेल तर त्याला जोरदार उत्तर देणे. भारतीय सीमेवर डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भारत देशाचे रक्षण करतो. देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपले सर्वस्व पणाला लावून जीवाची बाजी लावणाऱ्या, देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे ऋण फेडावे तितके कमीच आहे, परंतु जेव्हा त्यांच्याच घरात, आणि ते सुद्धा त्यांच्या मुलीबाबत एखादा गुन्हा घडतो, तेव्हा कोणत्याच पित्याला सहन होणार नाही, गुजरातमध्ये (Gujarat) अशीच एक लाजिरवाणी घटना घडली आहे. जिथे चक्क देशाचे रक्षण करणाऱ्या BSF जवानाच्या (BSF) मुलीचाच अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला. याचा विरोध केल्यामुळे बीएसएफ जवानाला बेदम मारहाण करण्यात आली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. 



देशाचे रक्षण करणाऱ्या BSF जवानाच्या मुलीचाच बनवला अश्लील व्हिडीओ


भारत देशाचे आणि देशातील जनतेचे संरक्षण करणारे, सीमेवर अहोरात्र पहारा देणारे हे भारतीय जवान.. त्यांच्याबद्दल देशवासियांना अभिमान आहे. खरं तर त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. पण गुजरातमधील घटना ऐकून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातमधील (Gujarat) नडियाद जिल्ह्यात (Nadiad) बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. येथील एका बीएसएफ जवानाच्या मुलीच्या अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला होता. आपल्याच मुलीच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडणे त्या जवानासाठी अत्यंत वेदनादायी होते. याचा जाब विचारण्यासाठी तसेच या घटनेचा विरोध करण्यासाठी आरोपीच्या घरी गेलेल्या जवानाला चक्क बेदम मारहाण करण्यात आली. नडियाद पोलिसांनी सांगितले, BSF जवान मेलजीभाई वाघेला आणि त्यांचा मुलगा काही नातेवाईकांसह या घटनेतील आरोपी शैलेश जाधवच्या घरी गेले होते. यादरम्यान जोरदार हाणामारी झाली. आरोपीच्या घरी पोहोचल्यावर जवान आणि आरोपीच्या गटांमध्ये झालेल्या भांडणात आरोपीचे वडील, काका आणि इतर कुटुंबीयांनी वाघेला यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


 


 






 


बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक


डीएसपी व्हीआर बाजपेयी यांनी बीएसएफ जवानाच्या हत्येप्रकरणी अटकेला दुजोरा दिला आहे. डीएसपीने सांगितले की, 24 डिसेंबर रोजी नडियादमध्ये अश्लील व्हिडिओला विरोध केल्यामुळे मुलीची हत्या करण्यात आली होती. यादरम्यान पीडित जवानाचा मुलगाही जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी सांगितले की, बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला यांची हत्या केल्यानंतर सात आरोपींना अटक करण्यात आली होती.



व्हिडीओ ऑनलाइन केला शेअर


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तसेच नोंदवलेल्या एफआयआरनुसार, गुजरात नडियाद तहसीलच्या वानीपुरा गावातील शैलेश उर्फ ​​सुनील जाधव याने बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला यांच्या मुलीचा व्हिडिओ बनवला होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने अपलोड केल्यानंतर तो ऑनलाइन शेअर करण्यात आला. याबाबत बीएसएफ जवान वाघेला कुटुंबीयांसह आरोपीच्या घरी पोहोचले होते. शैलेश हा बीएसएफ जवानाच्या मुलीचा शाळेत असल्याचे सांगण्यात येत आहे. 24 डिसेंबर रोजी शैलेशच्या घरात भांडण झाले तेव्हा बीएसएफ जवानाची मुलगी घटनास्थळी उपस्थित नव्हती. वाघेला यांचा मुलगा नवदीप याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.