याच 19 जिल्ह्यांमध्ये 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान झालं. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. 2012 साली या 19 जिल्ह्यांमध्ये 70 टक्के मतदान झालं होतं. सर्व पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.
दरम्यान मतदानानंतर भाजपच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे आभार मानले. गुजरातमध्ये भाजपचा मोठा विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.
मतदानाची टक्केवारी
- कच्छ - 63 टक्के, (2012 साली) 68.25 टक्के
- राजकोट - 70 टक्के, (2012 साली) 71.58 टक्के
- जामनगर - 65 टक्के (2012 साली) 69 टक्के
LIVE UPDATE :
- दुपारी चार वाजेपर्यंत 47 टक्के मतदान
- संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ, त्यावेळी जे मतदार रांगेत असतील, त्या सर्वांना टोकन देण्यात येणार, ज्यांच्याकडे टोकन त्यांनाच मतदान करता येणार
- दुपारी दोन वाजेपर्यंत 36 टक्के मतदान
- मतदानादरम्यान 100 हून अधिक ईव्हीएम खराब झाल्याची माहिती
- दुपारी 12 वाजेपर्यंत 19 जिल्ह्यातील 89 जागांवर 21.09 टक्के मतदानं झालं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 18 टक्के तर 10 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान झालं होतं.
- गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सकाळी 11 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान
- गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण 10 टक्के मतदान झालं आहे.
- सकाळी दहा वाजेपर्यंत भावनगरमध्ये 11.88, गिर सोमनाथमध्ये 14.3, कच्छमध्ये 5.29, सुरेंद्रनगरमध्ये 11.32, राजकोटमध्ये 12.51, जामनगरमध्ये 7.08, पोरबंदरमध्ये 10.39, जूनागढ़मध्ये 11.24, अमरेलीमध्ये 8.65, नर्मदामध्ये 5.65, भरूचमध्ये 8.21,सूरतमध्ये 8.65, डांगमध्ये 5.66, नवसारीमध्ये 11.94, वलसाढ़मध्ये 11.99, तापीमध्ये 12.53, मोरबीमध्ये 14.2, द्रारकामध्ये 9.07, सोमनाथमध्ये 6.82 और बोटादमध्ये 12.55 टक्के मतदान झालं आहे.
- टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानं राजकोटमध्ये मतदानाचा हक्क बजावला
- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवत आहेत. आज सकाळी नऊच्या दरम्यान त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांंधींचं गुजरातमधील मतदारांना आवाहन
- निवडणूक आयोगानं मतदानासाठी संपूर्ण तयारी केली असून मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 'आज गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. मी सर्व मतदारांना लोकशाहीच्या या सणात सहभागी होण्याचं आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करतो.' असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
- पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे.
ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार?
- सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील या भागात भाजपचाच दबदबा असल्याचं दिसून येत आहे. मात्र, यंदा मतदारराजा कोणाला कौल देणार हे 18 डिसेंबरलाच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा विसरली : हार्दिक पटेल
मोदींना 'नीच' म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यरांवर काँग्रेसची तात्काळ कारवाई
मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा
योगी गुजरातमध्ये, मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार
गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी
गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत 500 कोटींचा सट्टा, कोण जिंकणार?
मी नरेंद्रभाईसारखा नाही, माणूस आहे, चुकतो : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं
ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार?
ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'