Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहे. गुजरातमध्ये (BJP) भाजप 150 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. गुजरातमधील भाजपचा विजय हा राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेससाठी धोक्याची घंटा असणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण पुढच्या काही महिन्यांमध्येच या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र कर्नाटक ( karnataka) राज्यात काँग्रेससमोर सत्ताधारी भाजपचं मोठं आव्हान असणार आहे. 


उत्तर भारतातील निवडणुकांच्या निकालांचा परिणाम कर्नाटकवर (karnataka)


उत्तर भारतातील निवडणुकांच्या निकालांचा परिणाम हा दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यावरही होतो. कारण मोठ्या संख्येनं उत्तर भारतातील हिंदी भाषीक लोक कर्नाटक राज्यात स्थायिक झाले आहे. त्यांनाही तिथे मतदानाचा अधिकार आहे. याचा परिणाम कर्नाटकच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जाते. 


गुजरातच्या निकालाचा (Gujarat Assembly Election ) कर्नाटकवर परिणाम होणार नाही : सिद्धरामय्या 


गुजरातच्या निकालाचा कोणताही परिणाम कर्नाटकच्या निवडणुकीवर होणार नसल्याचे मत कर्नाटकमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि  विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. कारण दोन्ही राज्यांतील मुद्दे, राजकीय घटक पूर्णपणे भिन्न असल्याचे ते म्हणाले. 2012 मध्ये गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचा 2013 मधील कर्नाटक निवडणुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ते 
म्हणाले. हाच निकाल पुढेही कायम राहिल असे सिद्धरामय्या म्हणाले. 


आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ, बसवराज बोम्मईंचा (Basavaraj Bommai) दावा


गुजरात आणि हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला जनादेश असेल असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले. कारण लोक पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कारभाराला पाठिंबा देत असल्याचे बोम्मई म्हणाले. कर्नाटक निवडणुकीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. पुढील वर्षी आम्ही निश्चितपणे कर्नाटकमध्ये सत्तेत येऊ असे बोम्मई म्हणाले.


2018 मध्ये कर्नाटकात कोणत्या पक्षाला किती जागा?


मे 2018 मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 विधानसभेच्या जागांपैकी केवळ 222 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या JD(S) यांच्यात तिरंगी लढत झाली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हते. त्यांना बहुमताच्या आकड्यापेक्षा 9 जागा कमी मिळाल्या होत्या. काँग्रेसला 78 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.


महत्त्वाच्या बातम्या:


Gujarat Assembly Election Winning Candidate List: गुजरातमधील निवडणुकीतील आघाडीवरील उमेदवारांची यादी एका क्लिकवर