नवी दिल्ली : जर तुम्हाला 'एक खरेदी करा, एक मोफत मिळवा' यासारख्या ऑफर्समध्ये इंटरेस्ट असेल, तर एक
तुमच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. जीएसटी लागू झाल्यावर 'बाय वन गेट वन फ्री' यासारख्या योजनांना चाप बसला आहे. मोफत वस्तूंवरील कर आकारणीमुळे कंपन्यांना ही ऑफर परवडेनाशी झाली आहे.

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर मोफत दिल्या जाणार्‍या वस्तूंवरही कर आकारला जात आहे. त्यातच ‘इनपुट क्रेडिट टॅक्स’च्या तरतुदीनुसार मिळणारी खरेदीवरील कर सवलत या ‘मोफत’ वस्तूंवर मिळणार नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू मोफत देणं शक्य नसल्याचं काही कंपन्यांनी जाहीर केलं आहे.

अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर स्वतंत्र डिस्काऊंट जाहीर केला आहे, मात्र 'एकावर एक फ्री' ही संकल्पना आता बाद होण्याची शक्यता आहे. नव्या उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या सहसा 'बाय वन गेट वन फ्री' सारख्या ऑफर्स जाहीर करते.