जीएसटी परिषदेच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांची घरखरेदी आधीच झाली आहे, त्यांच्या हफ्त्यांवरही हे नवे दर लागू होणार आहेत. मात्र कररचनेतील या नव्या बदलानंतर बिल्डरांना इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा दाखल करता येणार नाही.
VIDEO | निर्णाणाधीन घरांवरचा जीएसटी 12 वरुन 5 टक्क्यांवर : अरुण जेटली | नवी दिल्ली | एबीपी माझा
चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये सवलतीच्या घराची मर्यादा 60 चौरस मीटर ठेवण्यात आली आहे. तसेच लहान शहरांमध्ये 90 चौरस मीटरचे घर सवलतीच्या श्रेणीमध्ये असणार आहे. ज्याची कमाल किंमत 45 लाख रुपये असेल. ही नवीन दरं एक एप्रिलपासून लागू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली आहे. रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी हे बदल केले असून यामुळे अधिकाधिक लोकांना याचा लाभ घेता येईल आणि बांधकाम क्षेत्राला या कपातीचा मोठा फायदा मिळेल',असं जेटली म्हणाले.