संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, काही माजी पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. मात्र, काँग्रेसनं या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
राष्ट्रपती आणि पंतप्रधान संबोधित करणार:
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये रात्री 11 वाजता जीएसटी लागू करण्यासाठी एक कार्यक्रम सुरु होणार आहे. रात्री 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. यानंतर 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देशात जीएसटी लागू झाल्याची घोषणा करतील.
कोण-कोण सहभागी होणार?
80 मिनिटांच्या या कार्यक्रमासाठी देशभरातील जवळजवळ 100 बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन, भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती रतन टाटा, कायदे तज्ज्ञ सोली सोराबजी, केके वेणुगोपाल आणि हरिश साळवे यांच्यासारखे अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत.
भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, आरबीआय गर्व्हनर उर्जित पटेल, माजी गर्व्हनर सी रंगराजन, बिमल जालान, वाईव्ही रेड्डी आणि डी सुब्बाराव हे देखील उपस्थित राहणार आहेत.
एवढंच नाही तर मेट्रो मॅन श्रीधरन, शेती वैज्ञानिक एम स्वामीनाथन, मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्यासह अनेकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
कार्यक्रमावर कुणा-कुणाचा बहिष्कार?
काँग्रेस आणि आरजेडीसह ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसनं जीएसटी लाँचिंग कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीलाच या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
कसा असणार जीएसटी लाँचिग कार्यक्रम?
- जीएसटीचा कार्यक्रम रात्री 10 वाजून 45 मिनिटानं सुरु होईल.
- सर्वात आधी उपस्थित पाहुण्यांना जीएसटीवर आधारित 10 मिनिटाची एक शॉर्टफिल्म दाखवण्यात येईल.
- त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली हे उद्घाटनपर भाषण करतील.
- राष्ट्रपती आणि पंतप्रधान जवळजवळ 25 मिनिटं भाषण करतील.
- रात्री 12 वाजता राष्ट्रपती घंटा वाजवून जीएसटी लागू झाल्याची घोषणा करतील.
- त्यानंतर 2 मिनिटांनी आणखी एक शॉर्टफिल्म दाखवली जाईल.
जीएसटी लाँचिंग सोहळ्याचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम:
- रात्री 10 वाजून 55 मिनिट: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसद भवनात पोहचतील. त्यांचं स्वागत करण्यात येईल.
- रात्री 10 वाजून 59 मिनिट: मार्शल राष्ट्रपती आल्याची घोषणा करतील
- रात्री 11 वाजता: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करतील
- रात्री 11 वाजून एक मिनिट: राष्ट्रगीत होणार
- रात्री 11 वाजून दोन मिनिट: अर्थमंत्री अरुण जेटली जीएसटीबाबत माहिती देतील
- रात्री 11 वाजून 10 मिनिट: जीएसटीवर आधारित एक शॉर्टफिल्म दाखवण्यात येईल.
- रात्री 11 वाजून 15 मिनिट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होईल
- रात्री 11 वाजून 45 मिनिट: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं भाषण होईल
- रात्री 12 वाजता: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी घंटा वाजवून जीएसटी लाँच करतील.
- रात्री 12 वाजून 04 मिनिट: राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप होईल.
संबंधित बातम्या:
जीएसटी लागू होण्यापूर्वी आज मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!
महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार
जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!
जीएसटी कराविरोधात चित्रपट महामंडळ संपाच्या तयारीत
सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी, 1 जुलैपासून जीएसटी लागू
जीएसटी मंजुरीमुळे 'मातोश्री'ला काय मिळणार? : वळसे-पाटील
जमीन आणि घरभाड्यावर जीएसटी लागणार!
कीर्तनकार, भागवत कथाकारांनाही जीएसटी, कररचनेत बदल
जीएसटी आल्यानं नेमका फायदा काय?