नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. हे अधिवेशन उत्तमरित्या चालेल अशी आशा यावेळी मोदींनी व्यक्त केली. तसेच मोदींनी GST चा एक वेगळा अर्थही सांगितला. 'GST म्हणजेच Growing Stronger Together,'
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'येत्या 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. याच अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागून राहणार आहे.'
GSTचा अर्थ ‘’Growing Stronger Together,
पंतप्रधान मोदींनी जीएसटी यशस्वी झाल्याचं सांगत असं स्पष्ट केलं की, 'जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष, सर्व सरकार फक्त आणि फक्त राष्ट्रहितासाठी एखादा निर्णय घेतात तेव्हा तो किती महत्त्वपूर्ण असतो हे जीएसटीच्या निमित्तानं दिसून आलं आहे.'
कोणत्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार?
या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची आंदोलनं, गोरक्षकांशी निगडीत घटना, काश्मीर तणाव, चीनबाबतचे प्रश्न या आणि यासारख्या प्रश्नांवर विरोधक सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींनी समजावला GSTचा वेगळा अर्थ!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2017 12:51 PM (IST)
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला. हे अधिवेशन उत्तमरित्या चालेल अशी आशा यावेळी मोदींनी व्यक्त केली. तसेच मोदींनी GST चा एक वेगळा अर्थही सांगितला. 'GST म्हणजेच Growing Stronger Together,'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -