लाल किल्ल्याजवळ ग्रेनेड सापडल्याने खळबळ
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2017 10:53 AM (IST)
नवी दिल्ली: एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार होत असल्यामुळे सीमेवर तणाव आहे. त्यातच आता राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ ग्रेनेड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने हा ग्रेनेड निकामी होता. मात्र भारताची शान असलेल्या लाल किल्ल्याजवळ चक्क ग्रेनेड सापडल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दैनंदिन तपासणीदरम्यान काल रात्री हा ग्रेनेड सापडला. ग्रेनेड सापडल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनएसजी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, झाडाझडतीला सुरुवात केली. निकामी ग्रेनेड ताब्यात घेऊन त्याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही स्फोटकांचा एक बॉक्स सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.