नवी दिल्ली : यंदा इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म भरताना तुम्हाला नोटाबंदीच्या काळात बँकेत भरलेल्या रकमेची माहिती द्यावी लागणार आहे. नोटाबंदीच्या काळात 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम भरणाऱ्यांना ही माहिती द्यावी लागणार आहे. त्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्मच्या पार्ट ई मध्ये विशेष रकाना देण्यात आला आहे.




सरकारनं यंदा इन्कम टॅक्स रिर्टनचा फॉर्म अधिक सुलभ केला आहे. अर्थमंत्री अरूण जेटलीनं अर्थसंकल्प सादर करताना सोप्या फॉर्मची घोषणा केली होती. त्यानुसार वार्षिक 50 लाखांपर्यंतच उत्पन्न असणाऱ्यांना एक पानी फॉर्म भरावा लागणार आहे.

नव्या फॉर्मची वैशिष्ट्यं :

  • टॅक्स भरणाऱ्या सुमारे दोन कोटी जणांना याचा फायदा

  • आयटीआर फॉर्मची एकूण संख्या 9 वरुन 7 वर

  • आयटीआर 2, 2 ए आणि 3 ऐवजी आता आयटीआर 2 असेल

  • आयटीआर 4 ऐवजी आयटीआर 3

  • आयटीआर 4 S ऐवजी आयटीआर 4 (सुगम)

  • या सर्व फॉर्मच्या आधारे रिटर्न इलेक्ट्रॉनिकली भरणं शक्य


ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे आणि ज्यांना रिफंडची आवश्यकता नाही, असे लोक आयटीआर 1 किंवा आयटीआर 4 (सुगम) द्वारे कागदोपत्री इन्कम टॅक्स रिटर्न भरु शकतात. 80 वर्षांहून अधिव वय असलेल्यांसाठीही हीच सुविधा आहे.