वाराणसी : भारतीय नागरिकांना येत्या काळात ई-पासपोर्ट दिले जाणार आहेत. एका केंद्रीकृत पासपोर्ट प्रणालीद्वारे चिप आधारित ई-पासपोर्ट जारी करण्याचे काम सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे आयोजित एका समारंभात याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रकल्पाद्वारे जागतिक स्तरावर सर्व दूतावासांशी जोडले जाणार आहेत. सर्व भारतीयांच्या सेवेसाठी पासपोर्ट सेवेशी संबधित एक केंद्रीकृत प्रणाली तयार केली जाणार आहे. त्यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन चिप आधारित ई-पासपोर्टसाठी काम केले जाणार आहे.
एटीएम कार्डनंतर आता पासपोर्टमध्येही चिप लावली जाणार आहे. यामुळे पासपोर्टची सुरक्षा, प्रिंटिंग आणि पेपर क्वालिटीत सुधारणा होईल, असे म्हटले जात आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिकमध्ये या पासपोर्टची निमिर्ती केली जाणार आहे. पासपोर्टमध्ये चिप लावल्यामुळे ई-पासपोर्ट बनवणे सोपे जाणार असल्याची माहिती मोदींनी सांगितले.
भारतीयांना मिळणार चिप आधारित ई-पासपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2019 09:16 AM (IST)
भारतीय नागरिकांना येत्या काळात ई-पासपोर्ट दिले जाणार आहेत. एका केंद्रीकृत पासपोर्ट प्रणालीद्वारे चिप आधारित ई-पासपोर्ट जारी करण्याचे काम सध्या सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -