नवी दिल्ली : प्रसिद्ध सोशल मीडिया अॅप टिकटॉक (Tiktok) आणि हेलो (Helo) यांच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारला संशय आहे की दोन्ही अॅप्सचा देश विरोधी कारवायांमध्ये सहभाग आहे.


यासंदर्भात दोन्ही अॅप्सना 21 प्रश्न विचारण्यात आले असून लवकरात लवकर त्यांची उत्तर मागवण्यात आली आहेत. प्रश्नांना योग्य उत्तरे न मिळाल्यास टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येऊ शकते. याशिवाय स्मार्ट टीव्हीच्या हॅकिंगचा मुद्दाही राज्यसभेत चर्चिला गेला.


स्वदेशी जागरण मंचने आरोप केले आहेत की, टिकटॉक आणि हॅलो अॅप देशविरोधी कारवायासाठी वापरण्यात येत आहे. टिकटॉकवर याआधीही काही आरोप लागण्यात आले होते. त्यासाठी काही दिवस या अॅपवर मद्रास हायकोर्टाने बंदीही आणली होती.



टिकटॉक आणि हॅलो अ‌ॅप कंपन्यांनी सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. भारतात आम्हाला चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. पुढील तीन वर्षात एक बिलियन डॉलर गुंतवणूक करण्याचं आमचं नियोजन आहे, असं दोन्ही कंपन्यांनी म्हटलं आहे.


सरकारने या अॅप्सच्या माध्यमातून लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच अॅपमुळे आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचाही आरोप होत.