Renewal of Registration of 15 Year Old Vehicles : 15 वर्ष जुन्या वाहनांच्या नुतनीकरणाबाबत केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं 15 वर्षांपूर्वीच्या गाड्यांचं नव्यानं रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या शुल्कात आठ पटीनं वाढ केली आहे. केंद्र सरकारनं केलेल्या घोषणेनुसार, आता पुढच्या वर्षी एप्रिलपासून जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी 5000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे, जे आधीच्या रकमेहून 8 पटींनी अधिक आहे. रस्ते, परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयानं सोमवारीपासून पुढच्या वर्षापर्यंत नवी व्यवस्था लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. 


8 पट जास्त शुल्क भरावं लागणार 


केंद्र सरकारद्वारे जुन्या वाहनांचं नुतनीकरणाबाबत करण्यात आलेल्या घोषणेनुसार, वाहनांचं नुतनीकरण करण्यासाठी आठ पटींनी वाढ करण्यात येत आहे. हा नवा नियम राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरणाचाच एक भाग आहे. अधिसूचनेनुसार, 15 वर्ष जुन्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राचं नुतनीकरण करण्यासाठी आता पहिल्याच्या तुलनेत आठ पटींहून अधिक शुल्क भरावं लागणार आहे. 


इतकं शुल्क आकारलं जाईल 


जुन्या वाहनांचं नुतनीकरण करण्यासाठी सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या नव्या नियमाांनुसार, 15 वर्ष जुन्या गाड्यांच्या नुतनीकरणासाठी 600 ऐवजी 5,000 रुपये आणि बाईक्ससाठी 300 ऐवजी 1000 रुपये, बस किंवा ट्रकसाठी 1500 रुपयांऐवजी 12,500 रुपयांचं शुल्क देणं आवश्यक आहे. 


दिल्ली-एनसीआरमध्ये नवा नियम लागू नाही 


दिल्ली-एनसीआरमधील वाहनांच्या मालिकेवर केंद्र सरकारचा हा नवा नियम लागू असणार नाही. दरम्यान, दिल्लीत 10 वर्ष जुन्या डिझेलवर चालणारी वाहनं आणि 15 वर्ष जुनी पेट्रोलवर चालणाऱ्या वाहानांवर आधापासूनच रोक लावण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सरकार द्वारे तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये रजिस्ट्रेशन कार्ड स्मार्ट कार्डप्रमाणे असेल. त्यासाठी 200 रुपयांचं अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. सरकारद्वारे तयार करण्यात आलेले हे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :