- बिलं भरता येणार
- कर भरता येणार
- रुग्णालय
- रेल्वे
- एअरलाईन्स
- पेट्रोल पंप
सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवली!
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 07:10 PM (IST)
नवी दिल्ली : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत केंद्र सरकारने तीन दिवसांनी वाढवली आहे. येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत कर, वीज, हॉस्पिटल इत्यादी सार्वजनिक सेवांसाठी जुन्या नोटांचा वापर करता येणार आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर अगदी काही वेळातच केंद्र सरकारने सार्वजनिक सेवांसाठी जुन्या नोटांच्या वापराची मुदत वाढवण्याची घोषणा केली. कुठे कुठे जुन्या नोटा 14 नोव्हेंबरपर्यंत चालणार?