काय आहे प्रकरण?
गोरखपूरमध्ये दारु गुत्ते आणि कच्च्या दारुविरोधात रास्तारोको करण्यासाठी महिला रस्त्यावर उरलेल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचवेळी हा रास्ता रोको हटवण्यासाठी आयपीएस अधिकारी चारु निगम फौजफाट्यासह दाखल झाल्या. त्यांनी हा जाम हटवण्याचा प्रयत्न सुरु केला.
त्याचवेळी आंदोलक महिलांनी पोलिसांवरच लाठ्यांनी हल्ला चढवला. यात चारू निमग जखमीही झाल्या. पण त्याचवेळी या महिलांची बाजू घेत भाजप आमदार राधामोहन दास पोहोचले आणि त्यांनी थेट आयपीएस अधिकारी चारु निगम यांनाच अपमानास्पद वागणूक दिली.
आमदारांच्या या वर्तनाने चारु निगम खचल्या आणि त्यांना रडू कोसळलं. आमदारांच्या या वर्तनावर मात्र चहू बाजूने टीका होत आहे.