मुंबई : वर्ल्ड ‘फादर्स डे’ जगभरात साजरा केला जातो आहे. आजचा दिवस वडील आणि मुलाचे नाते संबंध उलगडणारा  असतो. याच निमित्ताने गुगलने खास शुभेच्छा देणारे डुडल तयार केले आहे. गुगलने डुडलमध्ये वेगवेगळ्या हातांचे सहा पंजे डायनासोरच्या रुपात दाखवले आहे. ‘फादर्स डे’ ला या वर्षी १०८ वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी 17 जून म्हणजे आज हा दिवस साजरा करत आहे. वर्ल्ड ‘फादर्स डे’ निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. या आधी 'मदर्स डे'निमित्ताने गुगलने याच आधारावर डुडल तयार केल होतं. वर्ल्ड ‘फादर्स डे’ च्या निमुत्ताने बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यात अनुश्का शर्मा, इमरान हाश्मी, फरहान अख्तर शिल्पा शेट्टी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सामावेश आहे. भारताचा गोलंदाज हरभजन सिंगने सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून वर्ल्ड ‘फादर्स डे’ च्या शुभेच्छा दिल्या आहे.