मुंबई : अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. सोन्याच्या दरात झालेली तब्बल 12 हजार रुपयांची घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे. 


ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती 10 ग्रामसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. हेच दर मागील काही दिवसांपासून 44, 43 हजारांच्या घरात पोहोचले आहेत. ज्यामुळं हाच काळ सोनं खरेदी करत यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी योग्य असल्याचाच विचार अनेकांकडून केला जात आहे. सोन्याचे दर अशाच प्रकारे कमी होत असल्यामुळं या माध्यमातून थोडीथोडकी करत मोठी गुंवतणूक करणं फायद्याचं ठरु शकतं. 


WB Election 2021 | निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांना दुखापत, पायाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न 


सोन्याचे दर भविष्यात कसे असतील? 


एसएमसी रिसर्चनं क्लाइंट्सना दिलेल्या नोटमध्ये लिहिलं आहे की, डॉलरचा भाव वधारल्यामुळं सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. एसएमसी रिसर्चनुसार अमेरिकेची आर्थिक आकडेवारी, भविष्यातील निर्णय, अमेरिका चीन संबंध या साऱ्या गोष्टींचा सोन्याच्या दरांवरही परिणाम होताना दिसत आहे. सध्या सुरु असणाऱ्या आठवड्यात सोनं भक्कम स्थितीत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरीही दरांमध्ये काहीशी मंदीच असेल ही बाब नाकारण्यात आलेली नाही. परिणामी सोन्याचे दर हे 45 ते 49 हजारांच्या घरात तर, चांदी 65,200 ते 71,800 रुपयांच्या घरात विक्रीस उपलब्ध असेल अशी माहिती समोर आली आहे.