नवी दिल्ली : सातत्यानं बदलणाऱ्या Gold सोनं आणि Silver चांदीच्या दरांमध्ये बुधवारी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. अमेरिकेत FOMC च्या सभेपूर्वी ग्लोबल मार्केटच्या दरांमध्ये होणाऱ्या वाढीचे परिणाम इथं भारतातही झाले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत स्टीम्युलसला परवानगी मिळण्याच्या शक्यतेमुळं सोनं आणि चांदीच्या दरांत वाढ होत आहे. आर्थिक विकास दरात वाढ होण्यासोबतच महागाईही वाढत आहे. परिणामी सोन्याच्या दरांवरही याचेच परिणाम दिसून येत आहेत.
एमसीएक्समध्ये सोन्याच्या दरांत वाढ
बुधवारी एमसीएक्स मध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमसाठी 0.35 टक्के म्हणजेच 174 रुपयांनी वाढून 49,617 रुपये इतकी झाली. तर चांदीचे दर, प्रति किलो 0.67 टक्के म्हणजेच 434 रुपयांनी वाढून 65,287 रुपयांवर आल्याचं पाहायला मिळालं. अहमदाबादमध्ये बुधवारी गोल्ड स्पॉट 49103 रुपये प्रति दहा ग्रॅम दरानं विकलं गेलं तर, गोल्ड फ्यूचर 49550 प्रति दहा ग्रॅमवर विकलं गेलं.
दिल्लीतही वाढले सोन्याचे दर
मंगळवारी सोन्य़ाच्या दरांत 514 रुपयांनी वाढ होऊन हे दर 48,847 रुपयांवर पोहोचले. तर, चांदीचे तर 1046 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 63,612 रुपयांवर पोहोचले. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं 0.1 टक्क्यांनी घसरुन 1852.01 डॉलर वर पोहोचलं.
सोन्याच्या दरांमध्ये होणारे हे बदल पाहता देशाच्या अर्थव्यवस्थेसह सोनं खरेदी करु इच्छिणाऱ्यांची यासंदर्भातील गणितंही मोठ्या प्रमाणात बदलत आहेत.