हैदराबाद : सध्या डेस्टिनेशन वेडिंग तसंच थीमवेडिंगचा ट्रेण्ड आहे. पण आंध्रप्रदेशात काही दिवसांपूर्वी असं लग्न पार पडलं, ज्यात वऱ्हाडी आणि नवरा-नवरीच्या जागी 'देव' दिसत होते.
खरंतर या लग्नाची थीम गॉड अर्थात 'देव' ठेवण्यात आली होती. त्यामुळे नवरा-नवरीसह सर्व वऱ्हाडी मंडळी ब्रह्म, विष्णू, शंकर, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती आणि इतर देवी-देवतांच्या वेशभूषेत आले होते.
या लग्नाचं आयोजन नवरीचे वडील श्रीधर स्वामी यांनी केलं होतं. श्रीधर स्वामी खुद स्वत:ला संत असल्याचं सांगतात आणि मुक्कमला इथे त्यांचा आश्रमही आहे.
आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील तनुकु या ठिकाणी हे लग्न पार पडलं. नवरा-नवरीसाठी स्टेजवर शाही सिंहासन ठेवले होते. या हायप्रोफाईल लग्नात नवरी लक्ष्मीच्या वेशभुषेत होती तर नवऱ्याने विष्णूचं रुप धारण केलं होतं.
मागील काही दिवसात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांचं लग्न चर्चेत होतं. त्याचवेळी इंटरनेटवर साऊथच्या या अनोख्या लग्नाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
'गॉड' थिमवर लग्न, वधू-वर लक्ष्मी-नारायणाच्या रुपात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2017 01:47 PM (IST)
या लग्नाचं आयोजन नवरीचे वडील श्रीधर स्वामी यांनी केलं होतं. श्रीधर स्वामी खुद स्वत:ला संत असल्याचं सांगतात आणि मुक्कमला इथे त्यांचा आश्रमही आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -