पणजी : गोव्यात लग्नापूर्वी एचआयव्ही टेस्ट करणं आता बंधनकारक होणार आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे याबाबतीत कायदा करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
गोव्यासारख्या छोटया राज्यातही एचआयव्हीचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार एक नवीन कायदा करण्याचा विचार करत आहे. लग्नाची नोंदणी करण्याआधी पती-पत्नी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करुन घेणं बंधनकारक करण्याचं विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होणार आहे.
गोव्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. देहव्यापाराचे प्रमाणही या राज्यात जास्त आहे. त्यामुळे एड्सचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. याचाच विचार करुन लग्नाची नोंदणी करण्यासाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
एचआयव्हीसोबतच लग्नाआधी थॅलेसेमियाची चाचणी करणेही बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. "मी या कायद्याचं 100 टक्के समर्थन करत आहे. गोव्यात एचआयव्ही आणि थॅलेसेमिया या दोन्ही चाचण्या लग्नाआधी बंधनकारक करणं गरजेचं आहे, असं आपलं मत असल्याचं विश्वजीत राणे यांनी सांगितलं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्यात लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी करणं बंधनकारक होणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2019 10:23 AM (IST)
लग्नाची नोंदणी करण्याआधी पती-पत्नी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करुन घेणं बंधनकारक करण्याचं विधेयक लवकरच गोवा विधानसभेत सादर होणार आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -