गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लो ब्लड प्रेशर आणि डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने रविवारी (25 फेब्रुवारी) सायंकाळी त्यांना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
याआधी मनोहर पर्रीकर यांच्यावर प्रकृती खालवल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वादुपिंडाच्या विकारामुळे त्रस्त असलेल्या पर्रीकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी 22 तारखेला ते स्पेशल विमानाने मुंबईतून गोव्याला आले होते. मुंबईहून स्पेशल विमानाने पणजीत दाखल झालेल्या पर्रीकरांनी थेट विधानसभा गाठली आणि अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्प सादर केल्यापासून ते दोनापावल येथील आपल्या खासगी घरातून काम पाहात होते. डॉक्टरांनी इन्फेक्शन होऊ नये यासाठी त्यांना बाहेर फिरण्यास मज्जाव केला होता, त्यामुळे ते त्यांच्या खासगी घरातून कार्यालयीन कामकाज पाहात होते. उद्या (26 फेब्रुवारी) ते कार्यालयात हजर राहणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2018 11:21 PM (IST)
लो ब्लेड प्रेशर आणि डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने रविवारी सायंकाळी त्यांना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -