पणजी: उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसनं काँटे की टक्कर दिली. गोव्याच्या 40 जागांच्या विधानसभेत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला. मात्र 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला सत्ताधारी भाजप सत्तेसाठी छोट्या पक्षांशी युती करण्याची शक्यता आहे.
गोव्यात कुणाला किती जागा? भाजप - 13 काँग्रेस - 17 राष्ट्रवादी काँग्रेस -1 महाराष्ट्रवादी गोमंतक - 3 गोवा फॉरवर्ड पार्टी - 3 अपक्ष/इतर - 3 ****************** एकूण = 40 मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांचा पराभव खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या 6 मंत्र्यांचा पराभव झाला. भाजपशी फारकत घेतलेल्या सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचानं वेगळी चूल मांडल्यामुळं भाजपला मोठा फटका बसला.
भाजपचे पराभूत मंत्री मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर,उद्योगमंत्री महादेव नाईक,पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, जलस्त्रोत मंत्री दयानंद मांद्रेकर,वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, कामगारमंत्री आर्वेतान फुर्तादो या मंत्र्यांचा पराभव झाला. मतांच्या या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला मोठा फायदा झालेला दिसतोय. मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसनं आघाडी घेतली. भाजपला 13 आणि काँग्रेसला 17 जागांवर विजय मिळवला. दरम्यान गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षानं भाजपला मदत करण्याची तयारी दर्शवल्यामुळं भाजपचं पारडं काहीसं जड आहे.
अमित शहांची प्रतिक्रिया दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पंजाब वगळता उर्वरीत चारही राज्यात भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. संबंधित बातम्या
LIVE UPDATE LIVE #ABPResults – गोवा : भाजप 13, काँग्रेस 16, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 13, काँग्रेस 15, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 14, काँग्रेस 14, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 14, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 08 बाणावली:राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव विजयी,आलेमाव बंधू विजयी LIVE #ABPResults – गोवा: भाजप 13, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 काँग्रेसचे सुभाष शिरोडकर विजयी. LIVE #ABPResults – गोवा: भाजप 12, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 शिवोली:भाजपचे मंत्री दयानंद मांद्रेकर पराभूत,गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर विजयी LIVE #ABPResults – गोवा: भाजप 11, काँग्रेस 13, आप 00, गोसुमं आघाडी 03, इतर 07 कुंकल्ली:भाजपचे राजन नाईक पराभूत,अपक्ष ज्योकिम आलेमाव विजयी LIVE #ABPResults – गोवा: भाजप 13, काँग्रेस 11, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 06 शिरोडा: भाजपचे मंत्री महादेव नाईक पराभूत LIVE – गोवा: भाजप 12, काँग्रेस 12, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 01 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 09, काँग्रेस 12, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 04 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 09, काँग्रेस 11, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 05 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 08, काँग्रेस 12, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 05 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 07, काँग्रेस 11, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 05 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 04, काँग्रेस 06, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 03 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 05, काँग्रेस 09, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 04 BREAKING : गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव, मांद्रे मतदारसंघातून साडेतीन हजार मतांनी पराभूत LIVE #ABPResults – गोवा: भाजप 05, काँग्रेस 08, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 03 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 00, काँग्रेस 03, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 01 LIVE #ABPResults – गोवा: भाजप 00, काँग्रेस 02, आप 00, गोसुमं आघाडी 00, इतर 01 LIVE : गरज भासल्यास भाजपला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तयारी, सूत्रांची माहिती, गोव्यातल्या सत्ता समीकरणाचा सस्पेन्स वाढला LIVE: देवाचं दर्शन घेतलं आहे, मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होईल, देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईल.: लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्यात नेमकं काय होतं. याकडे महाराष्ट्राचंही लक्ष लागून राहिलं आहे. कारण येथं भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी युती केली होती. त्यामुळे गोव्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गोव्यात एकूण 40 जागा आहेत. सध्या भाजपकडे 21 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 7 जागा. त्यामुळे आता या निवडणुकीत गोवेकर कोण्याच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहावं लागेल.
गोवा विधानसभा 2012तील पक्षीय बलाबल – 40 - मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पार्सेकर
- विरोधी पक्ष : काँग्रेस 07
- भाजप – 21
- काँग्रेस- 07
- महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष -03
- गोवा विकास पक्ष-02
- अपक्ष -05
- 8रिकाम्या -02
संबंधित बातम्या: