GSK Pharma company Profit : ग्लैक्सो स्मिथक्लाइन फार्मास्यूटिकल्स (GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS) या फार्मा कंपनीसाठी आनंदाची बातमी आहे. या कंपनीच्या नफ्यात (Profit) मोठी वाढ झालीय. कंपनीच्या एकूण नफ्यात 46 टक्क्यांची वाढ झालीय. कंपनीचा नफा 194.48 कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, कंपनीच्या नफ्यात वाढ झाल्यामुळं गुंतवणुकदारांसाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. कंपनीने गुंतवणुकदारांना 320 टक्क्यांचा लाभांश जाहीर केलाय. 


आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झालीय. परिचालन उत्पन्नाचा विचार केला तर यावर्षी 929.8 कोटी रुपये आहे. जे मागील वर्षी 787.45 कोटी रुपये होते. तर या तिमाहीत एकूण खर्च 691.41 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 635.54 कोटी रुपये होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठी निव्वळ नफा 589.96 कोटी आणि ऑपरेटिंग उत्पन्न 3,453.71 कोटी होते.


गुंतवणूकदारांना मोठा फायदा 


ग्लैक्सो स्मिथक्लाइन फार्मास्यूटिकल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केलेल्यांसाठी चांगली बातमी मिळाली आहे. कंपनीच्या नफ्यात वाढ झाल्याचा फायदा गुंतवणुकदारांना होणार आहे. गुंतवणूकदारांना कंपनीने 320 टक्क्यांचा लाभांश जाहीर केलाय. दरम्यान कंपनीच्या निव्वळ नफ्यात 46 टक्क्यांची वाढ झालीय. कंपनीचा नफा वाढून 194.48 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा हा 133.43 कोटी रुपये होता.  


कंपनीच्या संचालक मंडळानं केली लाभांश देण्याची शिफारस 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून लाभांश जारी करण्यात आलाय. कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअरवर 32 रुपये म्हणजेच प्रति इक्विटी शेअर 320 टक्क्यांचा लाभांश देण्याची शिफारस देखील केली आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची मान्यता मिळणे आवश्यक आहे. 


महत्वाच्या बातम्या:


फार्मा क्षेत्रातील 'या' कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल