Glass Igloo Restaurant in India : जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) तेथील निसर्ग सौंदर्यामुळे देशातीलच नव्हेतर परदेशातीलही पर्यटकांना (Tourist) आकर्षित करतो. हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इकडे नेहमीच पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. सध्या हिवाळ्याच मोसमात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना ओघ जम्मू आणि काश्मीरकडे असतो. काश्मीरमधील 'ग्लास इग्लू' रेस्टॉरंट (Glass Igloo) म्हणजेच काचेचा इग्लू सध्या प्रचंड चर्चेत आहे. या काचेच्या इग्लूमध्ये बसून तुम्ही काचेच्या भिंतीपलिकडून येथील निसर्ग सौंदर्याचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.


भारतातील पहिलं ग्लास इग्लू रेस्टॉरंट


काश्मीरमधील (Kashmir) गुलमर्गच्या  (Gulmerg) जगप्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन आकर्षण तयार करण्यात आलं आहे. भारतातील पहिलं ग्लास इग्लू रेस्टॉरंट (Glass Igloo Restaurant) गुलमर्ग तयार करण्यात आलं आहे. हे अनोखं रेस्टारंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) होत आहे. यामुळे काचेच्या इग्लूमध्ये बसून बर्फवृष्टीचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा कल आहे. गुलमर्गमध्ये काचेचा इग्लू बांधण्यात आले आहेत. इग्लू ओपन रेस्टॉरंटचा एक भाग आहे. 


अनोख्या ग्लास इग्लू रेस्टॉरंटचा अविस्मरणीय अनुभव


ग्लास इग्लू म्हणजेच काचेचा इग्लू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. बर्फाच्छादित परिसर आणि पर्वतरांगांवरील बर्फाची चादर या निसर्ग सौंदर्याचा आनंद तुम्हाला येथे मिळेल. पर्यटक या ग्लास इग्लूचं कौतुक करताना थकत नाहीत. निसर्ग सौंदर्याचा आनंदे घेत तुम्ही येथे आरामदायी प्रकारे चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतात. या अनोख्या ग्लास इग्लू रेस्टॉरंटचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येत दाखल होत आहेत. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या गुलमर्गमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


ग्लास इग्लूला पर्यटकांची विशेष पसंती 


गुलमर्गमधील एका खाजगी हॉटेल मालकाने हे काचेच्या इग्सूचं रेस्टॉरंट तयार केलं आहे. पर्यटकांना एक अनोखा अनुभव देण्यासाठी एक अप्रतिम ग्लास इग्लू रेस्टॉरंट बांधण्यात आलं आहे. गेल्या वर्षी या हॉटेल मालकाने बर्फाचा इग्लू बनवला होता. त्यालाही पर्यटकांची विशेष पसंती मिळाली होती. त्यानंतर आता येथे काचेचा इग्लू तयार करण्या आला आहे. ग्लास इग्लू  हे भारतातील पहिले हॉटेल असल्याचा दावा हॉटेल मालकाने केला आहे. हॉटेलचे व्यवस्थापक हमीद मसूदी यांनी सांगितले की, हॉटेलच्या अंगणात तीन ग्लास इग्लू तयार करण्यात आले आहेत. हा ओपन हॉटेलचा भाग आहे.


काचेच्या भिंतीपलिकडून घ्या बर्फवृष्टीचा आनंद


आता नव्याने तयार करण्यात आलेल्या ग्लास इग्लू रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या संकल्पनेच्या नाविन्यपूर्णतेचे कौतुक केले आहे. येथील सुंदर वातावरणात जेवणाचा आनंद घेतल्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. एका पर्यटकाने येथील अनुभवाचं वर्णन करताना सांगितलं की, 'निसर्गाच्या इतक्या जवळ असलेल्या अशा ठिकाणी बसण्याचा विचार मी कधीच केला नाही.'