मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणासाठी तुमच्या काही कल्पना किंवा विचार असतील तर ते जरुर कळवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना केलं. मोदी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात नागरिकांनी सुचवलेल्या मुद्द्यांचा समावेश करतील.


‘माझ्या 15 ऑगस्टच्या भाषणासाठी तुमच्याकडे कोणत्या कल्पना किंवा विचार आहेत? हे जरुर शेअर करा. तुमच्या बहुमोल विचारांची मी वाट पाहत आहे,’ असं नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


‘नरेंद्र मोदी अॅप’च्या आधारे तुम्ही तुमचे मुद्दे पाठवू शकता. तसंच  ‘MyGov’ या वेबसाईटवरुनही तुम्हाला तुमचे विचार पंतप्रधानांपर्यंत पोहचवता येतील.





आपल्याकडे पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला  लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करण्याची मोठी परंपरा आहे.  या भाषणात पंतप्रधान देशातील महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य करत असतात. तसंच आपल्या कामाचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवत असतात.


दरम्यान,पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरील हे पाचवं भाषण आहे.