Ghulam Nabi Azad : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, नवीन पक्षाचे नाव आणि झेंडा हे काश्मीरचे लोकं ठरवतील असेही आझाद यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे आज जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) दौऱ्यावर आहेत. त्यांची आज सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.
आज जम्मू काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे भव्य स्वागत केले. तसेच त्यांच्या समर्थनार्थ रॅली देखील काढण्यात आली. काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांची सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. गुलाम नबी आझाद यांनी दिलेल्या राजीनाम्यात पक्षाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. प्रत्येक निर्णय कोणाशीही सल्लामसलत न करता घेतल्याचे आझाद म्हणाले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असल्याचा आरोप देखील आझाद यांनी केला होता.
पक्षासाठी 50 वर्ष काम केलं
मी काँग्रेस पक्षासाठी 50 वर्ष काम केलं आहे. या काळात मला जनतेनं खूप प्रेम दिलं असल्याचे आझाद म्हणाले. आज मी काहीही नाही, तरीही मला राज्यातील जनतेचे खूप प्रेम मिळत आहे. माझ्यामुळं अनेक जणांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. मला इतकं प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचे आझाद यावेळी म्हणाले. आम्ही आमच्या रक्त आणि घामानं काँग्रेसची स्थापना केली आहे. काँग्रेस ही संगणकाने नाही, ट्विटरने नाही, संदेशांने नाही तर आमच्या घामानं स्थापन केली आहे. आमची बदनामी करणार्यांचीच पोहोच ही फक्त ट्विटर आणि संगणकावर असल्याचा टोला देखील आझाद यांनी यावेळी लगावला. दरम्यान, 26 ऑगस्टला गुलाम नबी आझाद यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आझाद हे नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: