नवी दिल्ली :  नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाजीपूर बॉर्डरवर तणावाची परिस्थिती कायम असून आता उत्तर प्रदेश सरकारने आंदोलनाची जागा करणाऱ्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी गेल्या 60 दिवसापासून अधिक काळापासून आंदोलन सुरू आहे.  एबीपी न्यूजशी बोलताना टिकैत भावूक झाले. ते म्हणाले की, प्रशासन आमच्याशी संवाद साधत आहे तर दुसरीकडे भाजप आमदारांची माणसं आमच्या वयस्कर लोकांवर हल्ले करत आहेत. जे आमच्यासोबत आलेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसोबत गद्दारी झाली आहे. याचा न्याय याच दिल्लीत होणार आहे. पूर्ण देशातून शेतकरी येतील आणि आंदोलन करतील. राकेश टिकैत म्हणाले, '' ज्या मुद्यांसाठी मी इथं आलो आहे, तो पूर्ण होईपर्यंत मी जाणार नाही. आमच्यासोबत गद्दारी झाल्यानं मी भावूक झालोय. मी देखील भाजपला मत दिलं आहे, माझ्या पत्नीनं अन्य कुणाला मत दिलं. आम्ही कुण्या पार्टीविरोधात नाहीत, असं सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.


गाजीपूर बॉर्डरवर तणाव, आंदोलक शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे प्रशासनाचे आदेश


ते म्हणाले, गाझीपूर बॉर्डर खाली करायची असेल तर करा. तुमच्याजवळ प्रशासन आहे. भारत सरकारनं चर्चा करावी आणि कृषी बिलावर समाधान करावं. लाल किल्ल्यावर ज्यांनी झेंडा लावला त्यांच्यावर कारवाई करा. सरदारांना सरकारनं बदनाम करु नये, असं ते म्हणाले.


राकेश टिकैत म्हणाले, ...तर मी इथेच फाशी घेईल

राकेश टिकैत म्हणाले, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गोळी चालवली तरी आम्ही जागा खाली करणार नाही. गोळी चालवली तरी आम्ही मागे हटणार नाही. आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. कोणालाही अटक नाही होणार जर अटकेचा प्रयत्न केला तर मी इथेच फाशी घेईल.

शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश


दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाजीपूर बॉर्डरवर तणावाची परिस्थिती कायम असून आता उत्तर प्रदेश सरकारने आंदोलनाची जागा करणाऱ्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी गेल्या 60 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीनर गाजीपूर बॉर्डरवर पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. आदेशानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गाजियाबाद प्रशासनाशी बातचीत करणार नाही नसून या संदर्भात फक्त केंद्र सरकारशीचं चर्चा होईल.


गाजीपूर बॉर्डरवर तणाव, आंदोलक शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे प्रशासनाचे आदेश


गाजियाबाद सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मध्यरात्रीपर्यंत यूपी गेट खाली करण्याचे आदेश दिले आहे. गाजियाबादचे जिल्हाधिकारी अजय शंतर पांडे म्हणाले, दिल्लीतील यूपी गेटवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बातचीत केली असून रात्रीपर्यंत आंदोलनाची जागा खाली करण्यास सांगितले आहे. जर शेतकरी आंदोलकांनी जागा खाली नाही केली तर प्रशासनाला कडक पावले उचलावी लागतील.


काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आता आपली बाजू निवडण्याची वेळ आहे. माझा निर्णय झालाय. मी लोकशाहीसोबत, शेतकऱ्यांसोबत आहे आणि त्यांच्या शांतीपू्र्ण आंदोलनासोबत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.


शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल
ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बर्‍याच दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 37 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.